कोल्हापूर येथे दुसरे धम्मविचार संम्मेलन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 5 December 2019

कोल्हापूर येथे दुसरे धम्मविचार संम्मेलन

दुसरे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलन कोल्हापुरला

-----------------------------------------------
कोल्हापूर :   धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर च्या वतीने रविवार (दि. २) फेब्रुवारी २०२० रोजी एकदिवसीय दुसरे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
     धम्मविचार मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये रुजावा यासाठीच या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली पहिले धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलन प्रचंड यशस्वी झाले.
दुसरे साहित्य संमेलनही प्रचंड ताकतीने यशस्वी करण्याचा
 मानस आहे. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, तर उद्घाटक म्हणून धम्मचारी रत्नश्री हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे डॉ. बाबुराव गुरव व दिशा पिंकी शेख हे उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष प्रा. कपिल राजहंस हे राहणार आहेत.     
           संमेलनात विविध सामाजिक क्षेत्रात सहभागी असणारे कृतिशील विचारवंत, कार्यकर्ते, नेते डॉ. भारत पाटणकर, डॉ. गेल ऑम्वेट, विद्रोही शाहीर संभाजी भगत, डॉ. विठ्ठल शिंदे, डॉ. रवींद्र श्रावस्ती, डॉ. सतीशकुमार पाटील यांच्यासह अनेक कवी, लेखक, विचारवंत या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होऊन आपली भूमिका मांडणार आहेत.
         यावर्षीचा "धम्म प्रवर्तक जीवन गौरव पुरस्कार", ज्येष्ठ इतिहास संशोधक  मा. म. देशमुख यांना जाहीर करण्यात आला आहे.
   संमेलनास आपणाला शक्य असेल तेवढी आर्थिक मदत करुन सहकार्य करावे, असे आवाहन संम्मेलनाच्या आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.संमेलनामध्ये प्रचंड संख्येने सहभागी व्हा, संमेलनाचा प्रसार-प्रचार करण्यात मदत करा, शक्य असेल त्यांनी *धम्मविचार आणि क्रांती* या विषयावर लेख लिहा, संमेलनाच्या ठिकाणी होणाऱ्या प्रदर्शनात धम्म संस्कृती संदर्भाने पेंटींग(चित्र), शिल्प, कविता, पुस्तके यांचे प्रदर्शन लावा, सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे संमेलन लोकसहभागातून यशस्वी करण्यासाठी या संमेलनास मूठभर धान्य आणि एक नोट देऊन संमेलन यशस्वी करा, असे आवाहन संमेलनाचे निमंत्रक प्रा. करुणा मिणचेकर, स्वागताध्यक्ष प्रा. कपिल राजहंस व विश्वस्त डॉ. दयानंदन ठाणेकर,प्रा. शोभा चाळके
विमल पोखर्णीकर यांनी केले आहे.
--------------------------------------------

No comments:

Post a Comment

Pages