जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली “महिला सुरक्षा” विषयावर पत्रकारांसाठी कार्यशाळा
लातूर :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय लातूर च्या वतीने “महिला सुरक्षा” या विषयावर, मंगळवार, दिनांक 31 डिसेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दुपारी 4 वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही कार्यशाळा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा महिला व बाल कल्याण समिती च्या अध्यक्षा श्रीमती उमा व्यास,विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक यशवंत भंडारे व पोलिस अधिक्षक कार्यालयातील सायबर सेलचे पोलिस निरीक्षक नानासाहेब उबाळे हे महिला सुरक्षा,सायबर कायदे व वृत्तांकन या बाबत सविस्तर माहिती देणार आहेत.
तरी या कार्यशाळेस जिल्हयातील जास्तीत जास्त प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी केले आहे.
Monday, 30 December 2019
जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकारांसाठी कार्यशाळाचे आयोजन
Tags
# राज्य
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
राज्य
Labels:
राज्य
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.

No comments:
Post a Comment