जागतिक विक्रमी 'समतेचे महाकाव्य' या महाकाव्यग्रंथासाठी आवाहन..! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 30 December 2019

जागतिक विक्रमी 'समतेचे महाकाव्य' या महाकाव्यग्रंथासाठी आवाहन..!जागतिक विक्रमी 'समतेचे महाकाव्य' या महाकाव्यग्रंथासाठी आवाहन..!
-प्रा.नंदू वानखडे
             
मिडलपथ न्यूज नेटवर्क:
महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
हे अवघ्या जगातले एकमेव महाविद्वान 'विश्वरत्न' आहेत.
प्रत्येकांच्या ओठावर प्रत्येकांच्या वाणीत आहेत...
ज्यांच्यावर लाखो गाणी लिहलीत.. गायिलीत..
अनेक ग्रंथ बाबासाहेबावर लिहल्या गेलेत..
अनेक नाटकं ,अनेक कलाकृती,अनेक पथनाट्य, अनेक स्मारके, सर्वाधिक पुतळे आहेत जगभरात....
असा  एकही व्यक्ती, नेता अथवा कुणीच दुसरा बाबासाहेबाशिवाय  नाहीच....

ज्यांना ' दि सिम्बाॅल आॅफ नाॅलेज "म्हणून गौरविल्या गेलं...
ज्यांच्या नावाआधीअनेक गौरव विशेषणे , संबोधने लावल्या जातात..
अनेकाअधिक लोक ज्यांचं नाव घेऊनच दोन टाईमचं...सुखासमाधानाने खातात..

नव्हे, सर्वहारा बहूजन ,अभिजनासह आणि अख्खा देश ज्यांच्या अनंत ऊपकाराखाली ,ऋणात आहे...!
ते आहेत बोधिसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर !

जेंव्हा एखादा व्यक्ती बाबासाहेबांच्या जिवनाविषयी अभ्यासपूर्ण वाचन करतो तेंव्हा आणि तेंव्हाच तो वाचणारा व्यक्ती आंतर्बाह्य पूर्णपणे बदलून जातो कारण त्याला मानवता ,समता ,बंधूता,न्याय ही बाबासाहेबांनी अवलंबिलेली पटवून दिलेली मानवतेचे समतेचे मुल्ये जोपासलेली आणि संविधानात ती अंतर्भूत करून मानवकल्याणासाठी
राबविली जातात ही जिवनमुल्यें..किती महत्वाची आहेत..    ही जिवनमुल्यें समाविष्ठ करणारे आणि
असा विशाल दूरदृष्टीकोन असलेले बाबासाहेब त्यांना  समजलेले असतात...मग तो व्यक्ती बाबासाहेबांविषयी कृतज्ञभाव व्यक्त करत असतो.....
त्यासाठी बाबासाहेब वाचावे लागतील ,समजून घ्यावे लागतील आणि मग त्यांच्याविषयी लिहण्याची प्राज्ञा आपल्याला प्राप्त होईल...!

या आधीही, आपण बाबासाहेबावर लिहलेल्या कवितांचे अनेक भाषामध्ये प्रातिनिधिक कवितासंग्रह बघितलेत..
त्यातून अनेक जुन्या नव्या कविंचा परिचय बाबासाहेबांमुळेच झाला आहे.....

बाबासाहेबांवर लिहणारे नावारूपास येतात..कारण त्यांच्यात आपोआपच ह्या 'समाजजाणिवा ' निर्माण होतात....
ही सुध्दा फार मोठी ऊपलब्धीच
आहे..!

म्हणून बाबासाहेबांना मानवंदना..त्यांच्या जगतकल्याणकारी ,देशप्रेमी ,समाजहितकारी ,सुधारणावादी,आणि आपणास ऊमजलेल्या नानाविध जीवनपैलूवर आपण कविता करीत लिहत असाल ,कवि असाल तर कुठलाही खर्च ,फी,नाही.......
फक्त कविता पाठवा..ती दर्जेदार असावी..
'विद्रोह जरूर असावा पण टोकाचा नसावा..

बाबासाहेबांविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारी ,कुठल्याही छंदातली,कविता, रचना  पाठवू शकता..कवितेच्या खाली माझी कविता रचना समतेचे महाकाव्य ' या काव्यसंग्रहात समाविष्ठ करावी..ही ओळ टाकून खाली स्वाक्षरी करावी...!

संकल्पना

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जिवनावर असा मोठा काव्यग्रंथ असावा अशी संकल्पना अकोला येथीलच मा.राजेश खेवले साहेब ऊपजिल्हाधिकारी (निवडणूक विभाग), राहूलजी तायडे तहसिलदार(मुर्तिजापूर)  ,मा.प्रकाश अंधारे (ऊपशिक्षणाधिकारी, वाशिम)
अधिकारी मंडळीनीं मांडली व सदर महाकाव्य संग्रहासाठी संपूर्णपणे  योगदानासह आवाहन केलेलं आहे...
त्यासाठी मा.विश्वनाथजी शेगावकर सेवा निवृत्त, प्रधानसचिव तामिळनाडू राज्य ) यांचेही मार्गदर्शन सोबत आहे...

पाच हजार कवितांचा संकल्प
या समतेचे महाकाव्य ' पाच हजार कवितांचा संकल्प असलेल्या काव्यग्रंथासाठी संपादक मंडळाचा प्रतिनिधी म्हणून मी 100 कविंच्या कवितांची जबाबदारी घेतली आहे..
तरी आपण नंदू वानखडे मुंगळा जि.वाशिम 9423650468
या मोबाईल क्रमांकावर आपल्या कविता पाठवू शकता....
आणि या 'विश्वविक्रमी दर्जेदार कवितासंग्रहामध्ये' आपल्या कवितेचा समावेश करून घेऊ शकता....
आपण आपल्या इतरही कविमित्रांना सांगून सहभागासाठी प्रवृत्त करू शकता...
या साठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.... फक्त कविता पाठवा.. अधिक माहीतीसाठी माझ्या या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा..कविता 20 जानेवारी 2020 पर्यंत मिळतील अशा रितीने पाठवाव्यात...याच संग्रहासाठी आपण यापूर्वी कविता इतर प्रतिनिधीकडे पाठवली असल्यास माझ्याकडे पुन्हा पाठवू नका..

आगामी 14 एप्रिल 2020 रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी एक हजार कवितांचा पहीला खंड प्रकाशित होत आहे....

तरी सर्व माझ्या कविमित्रांना ,जेष्ठ कविमंडळीना
विनंती की आपण या अतिशय प्रशंसनिय जबाबदारीपूर्वक हाती घेतलेल्या
ऊपक्रमासाठी कविता पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन करित आहे...अधिक माहीतीसाठी जरूर संपर्क करा..

 - प्रा.नंदू वानखडे ,
मुंगळा ता.मालेगांव जि.वाशिम
whatsapp--9423650468

No comments:

Post a Comment

Pages