माळेगाव यात्रेत उद्या अश्व प्रदर्शन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 25 December 2019

माळेगाव यात्रेत उद्या अश्व प्रदर्शन



माळेगाव यात्रेत उद्या अश्व प्रदर्शन

नांदेड: माळेगाव हे लातूर आणी नांदेड जिल्ह्यातील सीमेवर असणारे एक छोटेसे गाव आहे. खंडोबाच्या वास्तव्याने नावारूपाला आलं अन प्रसिद्ध झाले , इथे भरणारी यात्रा ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा मानली  जाते कारण आहे येथे होणारा जनावरांचा व्यापार , या यात्रेत सर्व पाळीव प्राणी खरेदी अन विक्रीसाठी येतात प्रामुख्याने घोडा अन शेतीला पूरक जनावरे , डोंगर कपारीत राहणाऱ्या लमानी जमातीने अन धनगर समाजाने मायेने जपलेल्या अस्सल कारवान अन पष्मी जातीची श्वान इथे प्रदर्शन अन विक्रीसाठी येतात , काळाप्रमाणे इथे हॊसे , गवशे प्रेमी येतात.
तीनशे वर्षांहून अधिक प्राचीन परंपरा लाभलेली ही यात्रा आहे .

येथे जनावरांचा घोडे, उंट ,गाढव ,यांचा मोठा बाजार भरतो आणि यामध्ये मोठी आर्थिक उलाढाल होते.

येथील अश्व प्रदर्शनात महाराष्ट्रातील दिग्गज राजकारण्यांचे अश्व यात्रेकरूंचे लक्ष वेधून घेत असतात.

No comments:

Post a Comment

Pages