श्रीक्षेत्र माहूर येथे 'पंख' लघुचित्रपटाची निर्मिती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 24 December 2019

श्रीक्षेत्र माहूर येथे 'पंख' लघुचित्रपटाची निर्मिती


पंख या लघु चित्रपटातून भरारी घेण्यासाठी विद्यार्थांना मिळणार ऊर्जा: भोला सलाम

माहूर :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यात कलागुणांचा खजिना दडलेला असतो मात्र त्यांना रंगमंच उपलब्ध होत नसल्याने आपला कवी कलाविष्कार दाखविण्याची संधी त्यांना मिळत नाही.त्या मुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने पंख हा चित्रपट साकारण्यात आला आहे. 'पंख' या लघु चित्रपटातून भरारी घेण्यासाठी विद्यार्थांना  ऊर्जा मिळणार असल्याचे मत पंख चित्रपटांचे कथाकार भोला सलाम यांनी व्यक्त केले.

माहूर शहरातील श्री राजश्री शाहू महाराज फोंडेशनाच्या पुढाकाराने निर्मिती होत असलेल्या   लघु चित्रपट पंख या चित्रपटाच्या फलकाचे उद्घाटन नगराध्यक्ष शितल मेघराज जाधव, यांच्या हस्ते तर उपनगराध्यक्ष अश्विनीताई पाटील, माजी.पस सदस्य किसन राठोड, नगरसेवक इलियास बावाणी, मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सरफराज दोसानी, पत्रकार जयकुमार अडकिने, राज ठाकुर, नितेश बनसोडे, आनंद तूपदाळे, नंदू संतान, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रद्धा घोगरे, शितल केदार, आशीष जयस्वाल, लक्ष्मीकांत झांबरे, सुधीर जाधव, मनोज बरसागडे, ज्ञानेश्वर चौधरी, योगेश हेलगंड गुरुजी, रुपेश मोरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत जिनीयस किड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये मोठ्या थाटात संपन्न झाले.

पंख या लघु चित्रपटाचे निर्माते, संकल्पणाकार भाग्यवान भवरे यांनी आपल्या प्रास्ताविकात चित्रपटाबद्दल माहिती देताना सांगितले की, शेतकरी कष्टकरी गरीब दिनदुबळ्या व शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून यात गुन्हेगारीकडे वळलेला समाज, बालमनावर होणारे परिणाम व विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी या बद्दल कथा रेखाटलेली असून पालकांना नक्कीच या मराठी लघु पठाचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.तर माहूर ही कला काराना न्याय देणारी भूमी असून याच भूमीवरून संत विष्णुदास यांनी आपले अनेक काव्य लिहिले होते तर नुकतेच माहूर ची स्वर गायिका स्वराली जाधव हिने महाराष्ट्रात नाही तर देशात आपले नाव शिखरावर पोहचविले आहे.या चित्रपटात काम करणाऱ्या विद्यार्थांना यातून प्रेरणा मिळणार असल्याचे सरफराज दोसानी यांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्षा शीतल जाधव, किशन राठोड,जय कुमार अडकिने,नंदू संतान,आनंद तूपदाले यांनी आपले मत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. श्री राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन झालेल्या या कार्यक्रमात मराठी लघु लघुचित्रपट पंखचे दिग्दर्शक,अभिनेते लक्ष्मीकांत मुंडे, पटकथा गीत संगीतकार भोला सलाम, मिलिंद कंधारे, रंगभूषाकार गंगान्ना पोलास्वार,निर्मिती व्यवस्थापक प्रभाकर राठोड,मुख्य कलाकार साधना श्रीपदवार, जावेद खिलजी वाईकर, छायांकनकार फारुक शेख,या पंख टीम चे माहूरकराच्या वतीने उपस्थित मान्यवरांनी स्वागत सत्कार केला.

कार्यक्रमाच्या नियोजनसाठी प्राचार्य ममता सराफ, प्रफुल भवरे, किरण बैस, सविता दवणे, रूपा शेटकर, विद्या भवरे, कल्याणी खरवडे, प्रीती शिंगार, वैभव मुडांनकार, शुभम भवरे, आकाश भवरे, राजू गुलपूलकर यांनी परिश्रम घेतले. संचालन मुख्याध्यापक एस.एस.पाटील यांनी तर आभार शाळेचे संस्थापक अध्यक्ष भाग्यवान भवरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Pages