सानेगुरुजी जयंती निमित्त २५ व २६ डिसेंबरला भरगच्च कार्यक्रम
किनवट : साने गुरुजी जयंती व साने गुरुजी रुग्णालयाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी (दि.२५) सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत "आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळचे" आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटन उपविभागिय पोलिस अधिकारी मंदार नाईक हे करणार आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी उपविभागिय अधिकारी नरेंद देशमुख व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक शिवराज बोकडे हे उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यात एकपात्री प्रयोग, तबलावादन, लोकनृत्य, लोककला , मिमिक्री, इत्यादींचा समावेश आहे.यावेळी अभिनेत्री कविता मानकर, मुंबई या उपस्थित राहणार आहेत.
गुरुवारी (दि.२६) आरोग्य शिबीर होणार आहे.याअंतर्गत दंत आरोग्य जनजागृती,फिजिओ थेरपी व नाक, कान,घसा शिबीर होईल.तसेच रुग्णांप्रती कृतज्ञता सोहळा होईल.विशेष म्हणजे यावेळी डायलेसिस युनिटचे उद्घाटन ही होणार आहे.
दुपारी एक वाजता साई कल्याण मंडपम येथे रांगोळी स्पर्धा होणार आहे.सायंकाळी ७ वाजता (स्व.) उत्तमराव राठोड स्मृती संगीत महोत्सव होईल.यात "मैफल शब्द - सुरांची" हा कार्यक्रम होणार आहे.संगीतकार - आनंदी विकास, नांदेड हे सादरकर्ते आहेत ,तर विश्वास अंबेकर व शिवकांता पडोळे यांचा स्वर असणार आहे.साथसंगत संवादिनी: विकास देशमुख, तबला: वेदांत कुलकर्णी व चंद्रकांत अटकळीकर, किबोर्ड:प्रणव पडोळ ,मंजिरी:गिरीश देशमुख, संवाद:पद्माकर कुलकर्णी.
कार्यक्रमास संगीत रसीकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन साने गुरुजी रुग्णालयाचे प्रमुख डाॅ.अशोक बेलखोडे यांनी केले आहे.
Tuesday, 24 December 2019
सानेगुरुजी जयंती निमित्त आयोजलेल्या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद
Tags
# सांस्कृतिक
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
सांस्कृतिक
Labels:
सांस्कृतिक
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment