पोलिस रेझिंग डे निमित्त वाद - विवाद स्पर्धा संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 5 December 2019

पोलिस रेझिंग डे निमित्त वाद - विवाद स्पर्धा संपन्न

पोलिस रेझिंग डे निमित्त वाद - विवाद स्पर्धेत प्रणाली प्रदिप कांबळे हिस प्रथम, सांघिक गटात वैष्णवी नामदेव कुंभार व प्रणाली प्रदिप कांबळे यांना व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक


किनवट : पोलिस  रेझिंग डे निमित्त श्री. साईवंदना मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या वाद-विवाद स्पर्धेत महात्मा जोतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा (ता.किनवट) या शाळेस  वैयक्तिक गटात प्रणाली प्रदिप कांबळे हिस प्रथम, सांघिक गटात वैष्णवी नामदेव कुंभार व प्रणाली प्रदिप कांबळे यांना व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. 
    या वेळी आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते यशस्वीतांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. मंचावर अभि.प्रशांत ठमके,प्राचार्या. शुभांगी ठमके,उपविभागिय पोलिस अधिकारी मंदार नाईक, पोलिस निरीक्षक मारोती थोरात, नगराध्यक्ष आंनद मच्छेवार, के.मुर्ती, प्रा.किशनराव किनवटकर,प्रा. डाॅ.पंजाब शेरे, प्रा. डाॅ.सुनिल व्यवहारे या स्पर्धेचे परिक्षक शिक्षण विस्तार अधिकारी अनिल महामुने, अॅड.दिलीप काळे,प्रा.शुभांगी दिवे  हे उपस्थित होते. यशस्वीतांचे म.ज्यो.फु.क.महाविद्यालय, गोकुंदा (ता.किनवट) चे प्राचार्य राजाराम वाघमारे, उपप्राचार्य सुभाष राऊत पर्यवेक्षक एस.ए.बैसठाकुर यांच्यासह    प्राध्यापकवृंद यांनी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Pages