डॉ.आ.ह.साळुंखे अमृत महोत्सवी वर्ष - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 5 December 2019

डॉ.आ.ह.साळुंखे अमृत महोत्सवी वर्ष

प्रसिद्ध विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त किनवटच्या वतीने गौरव होणार

किनवट ( नांदेड ): परिवर्तनवादि चळवळीचे भाष्यकार,  प्रसिद्ध विचारवंत, इतिहास संशोधक व प्राच्यविद्या पंडित डाॅ.आ.ह.साळुंखे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा किनवटच्या गौरव समितिच्या वतीने शनिवारी (दि.७) सायंकाळी ७ वाजता गोकुंदा येथील गोपीकिशन मंगल कार्यालयात यथोचित गौरव करण्यात येणार आहे.
         गेल्या तीन दशकांपासून समता,लोकशाही,स्वातंत्र्य व मानवतावादी मुल्य आपल्या लेखन व संशोधनातून रुजविण्यात डाॅ.आ.ह.साळुंखे अग्रभागी राहिले आहेत.त्यांचे इतिहास व संस्कृती विषयाचे संशोधन पुढिल अनेक पिढ्यांना मार्गदर्शक राहतील.
    त्यांचा किनवट नगरवासीयांच्या वतीने यथोचित गौरव करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साने गुरुजी आरोग्य संकुलाचे संचालक डाॅ.अशोक बेलखोडे हे राहणार आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक डाॅ.नागनाथ कोत्तापल्ले व प्रा.डाॅ.दिलीप चव्हान हे उपस्थित राहणार आहेत.उपस्थित राहाण्याचे आवाहन गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages