नवनिर्वाचित आमदार भीमराव केराम यांची पहिली पत्रकार परिषद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 4 December 2019

नवनिर्वाचित आमदार भीमराव केराम यांची पहिली पत्रकार परिषद

तकलादु  कंत्राटदार एजंसीजना  काळ्या यादीत टाकण्यासाठी पाऊले उचलु, नवनिर्वाचित आमदार भीमराव केराम यांचा इशारा 

किनवट: मागील १५ वर्षांपासून विकास कामांच्या नावावर टक्केवारीने बरबटलेल्या बांधकाम कंत्राटदार एजन्सीने शासनाच्या निधीला चुना लावण्यापलीकडे दुसरे काहीच केले नाही,अशा तकलादु  कंत्राटदार एजंसीजना  काळ्या यादीत टाकण्यासाठी पाऊले उचलु,असा इशारा नवनिर्वाचित आमदार भीमराव केराम यांनी गोकुंदा (ता.किनवट) येथे घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत दिला.
      विविध कार्यालयांत मागील अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या कामचुकार यंत्रना लवकर हलविण्यात येतील.ग्रामीण भागातील दुर्गम व द-या खो-यात असलेल्या गावातील पाणी टंचाईवर कायम स्वरुपी मात करण्यासाठी प्राधान्य देऊ,असे केराम यांनी सांगितले.
     शेतसिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी तलाव निर्मितीसाठी प्रयत्न करु, ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी याबरोबरच मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करु.शेतक-यांना कौटुंबिक वारसा फेरफार करून मालकी ७/१२ मिळवून देण्यासाठी काम करु,प्रत्येक गावातील दलित वस्त्या,तांडे,वाड्या,गुडघ्यात अखंडीत विद्युत पुरवठा मिळावा यासाठी प्रयत्नशील राहु,प्रत्येक ठिकाणी नवीन रोहीत्र बसविण्यासाठी प्रयत्न करु तसेच ३३ के.व्ही.व ६६ के.व्ही. उभारुन.या बरोबरच ग्रामीण भागातील मंजुर वर्गास काम उपलब्ध करून देण्यासाठी संबंधीत यंत्रनांना कामाला लाऊ.संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी अग्रक्रमाने काम करु ,असे  आमदार भीमराव केराम यांनी यावेळी सांगितले.
     यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष बाबूराव केंद्रे,प्रा‌.किशन मिरासे,अनिल तिरमनवार,सुरेश रंगनेनवार, निळकंठ कातले, संतोष मरस्कोल्हे आदिंची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages