'सेक्युलर मुव्हमेंट' च्यावतीने महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे 'कला प्रदर्शन'
मुंबई (प्रतिनिधी): भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी व शनिवारी (दि.६ व ७) सेक्युलर कला प्रदर्शनाचे चैत्यभूमी, शिवाजी पार्क,दादर, मुंबई येथे आयोजन करण्यात आल्याचे "सेक्युलर मुव्हमेंट",या फुले-आंबेडकरी विचार धारेवर आधारलेल्या संघटनेचे अध्यक्ष प्रा.गौतमीपुत्र कांबळे यांनी सांगितले.
"सेक्युलर मुव्हमेंट," भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेल्या सेक्युलर समाजाच्या निर्मितीसाठी मागील पाच ते सहा वर्षांपासून कार्य करणारी एक सामाजिक संघटना आहे.तिच्या या उद्दीष्टपुर्तिसाठी चित्रकार व शिल्पकारांना सहभागी करुन त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे.
या कला प्रदर्शनास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईच्या एस.एन.डी.टी. महिला विद्यापिठाचे प्रा.व्हाईस चांसलर डाॅ.व्ही.एन.मगरे,डाॅ.योगेश कामत(आय.आर.एस.), जेष्ठ साहित्यिक योगिराज बागुल, जेष्ठ चित्रकार मोग्लान श्रावस्ती व वसंत सरवदे हे उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन "सेक्युलर मुव्हमेंट" चे कार्याध्यक्ष भरत शेळके, उपाध्यक्ष डाॅ.अशोक गायकवाड, सहसचिव प्रा.डाॅ.अंबादास कांबळे,राज्य समिती सदस्य अॅड.मिलिंद सर्पे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment