दाट धुक्यातून वाट काढत नव जीवनाची आशादायी किरणे घेऊन दिव्यांगांनी काढली प्रभातफेरी
किनवट :
... सूर्याची किरणं यायच्या आधी... किनवट शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भल्या पहाटे गुलाबी थंडीत...धुक्यातून वाट काढत निघालेल्या प्रभात फेरीतून... नव जीवनाची आशादायी किरणे घेऊन आम्ही निघालो असल्याचं दिव्यांगांनी मंगळवारी (ता. तीन ) जागतिक दिव्यांग दिनी दाखवून दिलं...
गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रभात फेरीस प्रारंभ केला. मुख्याध्यापक विठ्ठल वडजे यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश आमटे, देविदास धुर्वे, सुधीर गंगाखेडकर, शेख अन्सार व कमलकिशोर जोशी या शिक्षकांनी निवासी मुकबधीर विद्यालय, किनवट येथील आणि मुख्याध्यापक महादेव वायकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली केशव डहाके, नारायण अमृते, संतोष बिराजदार व ललिता जाधव या शिक्षकांनी सुसंस्कार निवासी मतीमंद विद्यालयातील विद्यार्थी या फेरीत सहभागी केले होते. वाचा दोष असतांनाही हाती घोषवाक्याचे बोलके फलक घेऊन त्यांनी दिव्यांग जनजागृतीचा सर्वांना संदेश दिला.
मुख्याध्यापक प्रदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी मुकबधीर विद्यालय, दत्तनगर, गोकुंदा आणि मुख्याध्यापक अरूण बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश बावीस्कर, मनोहर तेलंग, जयश्री इंगळे व अशोक ढगे या शिक्षकांनी गोकुंद्यात प्रभातफेरी काढली.
गट साधन केंद्र, किनवट येथे समावेशीत शिक्षण विभागाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांचे हस्ते मलकवाडी येथील अंगणवाडीचा विद्यार्थी स्वराज मारोती पालकर यास मोफत श्रवण यंत्र देण्यात आले. या कार्यक्रमासह फेरीत केंद्रिय मुख्याध्यापक राम बुसमवार, उत्तम कानिंदे, कनिष्ठ सहायक जी.जी. नैताम, समन्वयक संजय कांबळे, विषयतज्ज्ञ बाबूराव इब्बीतदार , राजेंद्र कंतुलवार, दयाल मोगरकर, संजय बोलेनवार, विषय शिक्षक दत्ता मुंडे, गोविंद बिच्चे, दिलीप मुनेश्वर, धनंजय नाईकवाडे, शिवदत्त जाधव, राजेंद्र नागरगोजे, परिचर बाळू कवडे आदिंची उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment