हिंगोलीच्या रस्ते विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही -केंद्रीयमंत्री गडकरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 3 December 2019

हिंगोलीच्या रस्ते विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही -केंद्रीयमंत्री गडकरी

हिंगोलीच्या रस्ते विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खासदार हेमंत पाटील यांना आश्वासन

किनवट ( नांदेड ):   आगामी काळात हिंगोली लोकसभा मतदार संघातील  रस्ते विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही व मतदार संघातील प्रस्तावित असलेली रस्त्याची सर्व कामे तात्काळ सुरु करण्यात येतील व प्रलंबित असलेली कामे लवकर सुरू करण्यात येतील, असे आश्वासन केंद्रीय रस्ते विकास कॅबिनेट मंत्री  यांनी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांना दिले . 
              खासदार हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी सदैव अग्रेसर राहून नवनवीन  प्रकल्प व सोइ सुविधा  मिळाव्यात यासाठी  प्रयत्न करत असतात मतदार संघाचा सर्वांगीण विकास हा एकाच ध्यास मनाशी बांधून संसदेत प्रश्न उपस्थित करतात . आणि वारंवार केंद्रीय मंत्र्याच्या भेटी घेऊन मतदार संघाचे प्रश्न मांडत असतात त्याच अनुषंगाने खासदार हेमंत पाटील यांनी आज केंद्रीय रस्ते विकास कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच भेट घेतली.
          यावेळी उभयंतांमध्ये हिंगोली  मतदार संघाच्या रस्ते विकासावर चर्चा झाली. यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी किनवट ते भोकरफाटा या महामार्गाचे संथ गतीने होणाऱ्या  कमला गती द्यावी, अशी मागणी करत  या मार्गा वरून किनवट कडे जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे           तसेच कळमनुरी ते वारंगा फाटा दरम्यान जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग १६१ साठी भूमी अधिग्रहण झाले असून अद्याप कामाला सुरवात झाली नाही ,या कामाची सुरवात लवकर करण्यात यावी आणि  कन्हेरगाव नाका ते वारंगाफाटा  दरम्यान महामार्गाचे काम मागील काही दिवसापासून रखडलेले आहे हे काम सुद्धा जलद गतीने करण्यात यावी, अशी मागणी केली यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वरील सर्व  कामाबाबत गांभीर्याने दाखल घेऊन लवकरच ही सर्व कामे जलद गतीने मार्गी लावण्यात येतील आणि आगामी काळात हिंगोली लोकसभा मतदार संघातील रस्ते  विकासाच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन दिले .

No comments:

Post a Comment

Pages