किनवट : साने गुरुजी जयंती व साने गुरुजी रुग्णालयाच्या २४ व्या वर्धापन दिन सोहळ्या निमित्त मंगळवारी (दि.२४) सकाळी १० वाजता इयत्ता ४ थी ते १२ च्या विद्यार्थ्यांसाठी "बाल आनंद महोत्सवाचे" आयोजन करण्यात आल्याचे साने गुरुजी रुग्णालयाचे प्रमुख डाॅ.अशोक बेलखोडे यांनी सांगितले.
महोत्सवाचे उद्घाटन उदगीर येथील ग्रंथमित्र दीपक बलसुरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथील पटकथाकार प्रकाश जाधव हे उपस्थित राहणार आहेत. रुग्णालयाच्या प्रांगनात गोदावरी अर्बन बँक पुरस्कृत होणा-या चित्र कला व रंगभरण स्पर्धेचे उद्घाटन उदगीर येथील अजयकुमार श्रीवास्तव हे करतील.
यानिमित्ताने कठपुतली, कोलाज व हस्तकला, मातिकाम, संगीत ,वादन व कठपुतली, सुंदर लेखन, फेस पेंटिंग, विज्ञान व अंधश्रद्धा व बांबू कला यांची दालने उघडण्यात आली आहेत. उपस्थित रहाण्याचे आवाहन भारत जोडो युवा अकादमी व साने गुरुजी रुग्णालय परिवाराने केले आहे.
No comments:
Post a Comment