व्हाॅलीबाॅल राज्य संघाचे व्यवस्थापक म्हणून श्रीनिवास सातूरवार यांची नियुक्ती
किनवट : भुवनेश्वर, ओरिसा येथे दि. २५ ते २ जानेवारी २०२० या कालावधीत ६२ वी वरिष्ठ गट (पुरूष) राष्ट्रीय व्हाॕलीबाॕल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी जाणा-या महाराष्ट्र राज्याच्या संघाचे व्यवस्थापक म्हणून महाराष्ट्र राज्य व्हाॕलीबाॕल संघटनेचे उपाध्यक्ष व किनवट येथील रहिवासी श्रीनीवास सातुरवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदरील संघ हा दि. २३ ला रवाना होणार आहे. श्रीनीवास सातुरवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment