महापरिनिर्वाणदिनी किनवटात ७८ रक्तदात्याने केले रक्तदान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 6 December 2019

महापरिनिर्वाणदिनी किनवटात ७८ रक्तदात्याने केले रक्तदान

महापरीनिर्वाण दिनानिमित्त यूवा पॅथंर तर्फे रक्तदान शिबीर

किनवट: महामानव विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३व्या महापरीनिर्वाण दिना निमित्त युवा पॅंथर चे अध्यक्ष राहुल प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली "यूवा पॅथंर " संघटने तर्फे आज (ता.६) रक्तदान शिबिराचेआयोजन करण्यात आले होते.
      आमदार भीमराव रामजी केराम यांनी शिबिराचे उद्घाटन केले.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष अजय चाडावार, माजी उपनगराध्यक्ष श्रिनिवास नेम्मानिवार,विनोद भरणे, महेंद्र नरवाडे, उत्तम कानिंदे ,अॅड.मिलींद सर्पे,किशन परेकार, गोकुळ भवरे, अनिल उमरे, सीसले, पोलिस उप निरीक्षक विजय कांबळे आदि उपस्थित होते.
       स्वामी विवेकानंद रक्तपेढी नांदेडचे राहूल वाघमारे, नामदेव पांचाळ ,विरेंद्र हराळ, राहुल देशमुख, हर्षद महाजन आदिंनी रक्तदान शिबिराचे काम पाहिले, तर शिबिराचेआयोजन "यूवा पॅथंर" संघटना  किनवट शाखेचे  निखिल कावळे, गौतम पाटील, सम्राट सर्पे, प्रशिक मूनेश्वर,अजित कावळे, राजेश पाटील, संजय नरवाडे, सुबोध सर्पे, विनोद सी. भरणे ,राहूल कांबळे, सतीश कापसे, लकी भरणे, सुगत नगराळे,अक्षय पोले,वैभव नगराळे, क्षितिज मूनेश्वर, काॅन्सटेबल अमोल गरड आदिनी आयोजन केले व परीश्रम घेतले
या रक्तदान शिबिरात डाॅ.अभिजीत ओव्हळ वैदकीय अधिकारी , दया पाटील, धम्मपाल वाघमारे, कपिल कांबळे, लक्ष्मीकांत कापसे, रामकिशन गेडाम, राजेंद्र सर्पे, मारोती मूनेश्वर, सम्यक सर्पे
आदि रक्तदात्यासह ७८ रक्तदात्यानी रक्तदान करून शिबीर यशस्वी केले.
गोकुंदा येथील महात्मा फुले विद्यालयात महामानवास अभिवादन

गोकुंदा ता. किनवट :
येथील महात्मा जोतिबा फुले विद्यालयात क्रांतीसूर्य जोतिबा फुले यांचा स्म्रुतीदिन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात अाला. जेष्ठ पर्यवेक्षक शेख हैदर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास उप मुख्याध्यापक जुम्माखान पठाण, पर्यवेक्षक महेंद्र नरवाडे, किशोर डांगे, अशोक भरणे, गौतम दामोदर, अंबादास जुनगरे, तुळशीराम वाडगुरे यांची प्रमुख उपस्थिती होती  प्रारंभ मीनाक्षी राठोड व सपना यांच्या' येरे भीवा' या गीताने झाला यावेळीश्रीकांत राठोड, प्रियंका चव्हाण,विश्वास पाटील,सुजल राठोड,अाकांक्षा कोतुरवार यांच्या सहअनेक विद्यार्थ्यांनी वरील महापुरुषांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला तसेच  गौतम दामोदर,अशोक भरणे व शेख हैदर यांची ही समयोचित भाषणे झाली .  स्वरांजली कांबळे यांनी श्रद्धांजली गीत गायीले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदा नगारे यांनी केले तर बंडू भाटशंकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Pages