नुकसान भरपाईच्या मदतीत बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक थांबवावी - खासदार हेमंत पाटील - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 6 December 2019

नुकसान भरपाईच्या मदतीत बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक थांबवावी - खासदार हेमंत पाटील


नुकसान भरपाईच्या मदतीत बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक थांबवावी - खासदार हेमंत पाटील
----------------------------------------
किनवट ( नांदेड ) :
        सहकारीबँकामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर आलेले नुकसान भरपाईचे पैसे कपात न करता व कोणतेही नियम न लावता त्यांना  आलेली पूर्ण मदत देण्यात यावी व शेतकऱ्यांची मुस्कटदाबी न करता अडवणूक   थांबवावी असा इशारा  खासदार  हेमंत पाटील यांनी दिला आहे . व शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी बद्दल त्यांनी आपली तक्रार किनवट येथील खासदार हेमंत पाटील यांचे जनसंपर्क कार्यलयात करावी.
            मागील काही  दिवसापासून निसर्गाच्या  लहरीपणामुळे जगाचा  पोशिंदा  शेतकरी  राजा हवालदिल झाला असून अस्मानी संकटाने हैराण झालेल्या शेतकऱ्याला शासन नुकसान भरपाई म्हणून काही मदत देऊ करत आहे, पण स्थानिक पातळीवरील यंत्रणा मात्र शेतकऱ्याला सुलतानी संकटात टाकत आहे . काही सहकारी बँकामध्ये शेतकऱ्यांचे खाते असून त्यांच्या खात्यावर पीक नुकसान भरपाई मदत येत आहे पण बँका मात्र  शेतकऱ्यांना किमान  अनामत रक्कम खात्यावर ठेवण्याच्या कारणावरून १००० रुपये ठेवून घेत आहेत आणि इतर नियम लावून पैसे कपात करत आहेत.
         शेतकऱ्यांना  मिळणाऱ्या तुटपुंजी रकमेत पण बँका नियम लावत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत . एकीकडे सरकार " जन धन " योजनेत कोणतीही  अनामत रक्कम न ठेवता खाते उघडत आहे  आणि दुसरीकडे काही सहकारी बँक मात्र शेतकऱ्यांची मुस्कटदाबी  करत आहे . यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत . याबाबत खासदार हेमंत पटली यांनी  शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करणाऱ्या बँकांना सज्जड इशारा दिला आहे अश्या प्रकारची अडवणूक करणाऱ्या बँकांच्या विरोधात  शेतकऱ्यांनी खासदार हेमंत पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय किनवट येथे तक्रार दाखल करावी असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.

No comments:

Post a Comment

Pages