महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 6 December 2019

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त किनवट येथे अभिवादन

किनवट: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी (दि.६) सकाळी १० वाजता भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉ.आंबेडकर यांच्या  पुतळ्याजवळ अभिवादनाचा कार्यक्रम झाला.
    प्रारंभी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके,आमदार भीमराव केराम, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपाध्यक्ष अजय चाडावार, माजी उपाध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार, रिपाइं चे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक, माजी नगराध्यक्ष अरूण आळणे, सेक्युलर मुव्हमेंट चे राज्य सहसचिव प्रा.डॉ.अंबादास कांबळे, पीरिपा चे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे राज्य समितीचे सहसचिव अॅड.मिलिंद सर्पे, डॉ.अभिजीत ओव्हळ यांनी डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या प्रसंगी महेंद्र नरवाडे व अनिल उमरे यांनी सामुहिक वंदना घेतली. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
      यावेळी प्राचार्या शुभांगी ठमके, अनिल येरेकार, मारोती मुनेश्वर, दशरथ पवार,अॅड.यशवंत गजभारे, अॅड.जी.एस.रायबोळे, विवेक ओंकार, क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश मुनेश्वर,कृष्णावती धोटे,सुरेश जाधव,शंकर नगराळे,  गंगुबाई परेकार, गंगाधर कदम, अंबर ठमके, मल्लूजी येरेकार, देविदास मुनेश्वर, अॅड.शामीले, सखाराम घुले, यादव नगारे, युवा पँथरचे निखिल कावळे, अॅड.सम्राट सर्पे, प्रशिक मुुनेश्वर, आत्मानंद सोनकांबळे, सुरेश पाटील, वामन कावळे, माजी नगराध्यक्ष के.मुर्ती, नरेंद्र दोराटे, माजी नगरसेवक प्रकाश नगराळे, विजय वाघमारे, आनंद गिमेकर, जीवन लाठे, माधव कावळे, विजय पोलासवार, किशन परेकार, संतोष मरस्कोले, के.के.साबळे, चांगदेव सोनुले, दया पाटील, प्रा.डॉ..आनंद भालेराव, संपादक साजीद बडगुजर, पत्रकार विजय जोशी, माधव नगारे, निळकंठ कातले, प्रविण गायकवाड, मारोती सुंकलवाड, उध्दव भवरे, सुरेश शेंडे, प्रा.सुबोध सर्पे, राजेेश  पाटील  दिगांबर मुनेश्वर, आकाश आळणे, अंकुश भालेराव, प्रशांत वाठोरे, उपशाम भगत, लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, दिलीप पाटील,मधुकर अन्नेलवार यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
अभिवादन दिनानिमित्त युवा पँथरचे संस्थापक अध्यक्ष राहूल प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली युवा पँथर किनवट शाखेच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी ७० च्या वर रक्तदात्यांनी रक्तदान करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Pages