हेअर कटींगच्या चालकाने केला ८१ मुलांचे कटींग करुन स्वतःचा वाढदिवस साजरा
किनवट : छत्रपती शिवाजी हायस्कूल बेलोरी धानोरा येथील ८१ मुलांची कटींग करुन किनवट येथील AJ हेअर पार्लर स्पा चे चालक अजय हळदकर यांचा अगळा वेगळा वाढ दिवस संस्थापक तथा मुख्याध्यापक सुरेश पाटील सोळंके व सचिव नंदाताई सोळंके यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
किनवट येथील AJ हेअर पार्लर अॅन्ड स्पा चे मालक अजय हळदकर यांचा आज दिनांक २७ डिसेंबर रोजी वाढदिवस होता. त्यांनी त्यांचा वाढदिवस आपले दुकान बंद करून दुकानातील सर्व कारागिर सोबत घेऊन अतिदुर्गम डोंगरी भागात असलेल्या छत्रपती शिवाजी हायस्कूल बेलोरी धानोरा ता. किनवट येथील गरीब ८१ मुलांची कटिंग करून एक आगळा वेगळा वाढ दिवस साजरा केला. ते शिवा पाटील सोळंके यांचे जिवलग मित्र आहेत .यावेळी अक्षय हाळदकर, श्रीनिवास पोलसवार, संतोष सवने, हर्षद मुनेश्वर ,शंकर बोडके राहणार किनवट यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी , शाळेतील विद्यार्थी मोठया संख्येने वाढदिवसास उपस्थित होते.
No comments:
Post a Comment