मुंबई येथे आझाद मैदानावरCAA व NRC विरुद्ध "सेक्युलर मुव्हमेंट",च्या वतीने निदर्शने/धरणे आंदोलन.
नांदेड : "सेक्युलर मुव्हमेंट" या फुले - आंबेडकरी विचार धारेवर आधारलेल्या सामाजिक संघटनेच्या व समविचारी संघटनांच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर दि.४ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी रजिस्टर या विरोधात निदर्शने व धरणे आंदोल करण्यात येणार असल्याचे सेक्युलर मुव्हमेंट चे राज्य अध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी सांगितले.
या धरणे व निदर्शने आंदोलनात राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष तथा जागतिक भाषा तज्ज्ञ डाॅ.गणेश देवी, अशोक लोखंडे, अनमोल धर्माधिकारी (दिग्दर्शक) यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
यावेळी CAA व NRC या नागरिकत्व कायद्याच्या विरोधात शांततेच्या मार्गाने सेक्युलर मुव्हमेंटच्या कला विभागाचे चित्रकार चित्राच्या माध्यमातून भारतीय एकात्मतेला बाधक ठरलेल्या कायद्याच्या विरोधात प्रतिक्रिया नोंदविण्याचा कार्यक्रम करणार आहेत.
४ जानेवारी रोजी होणारे हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन सेक्युलर मुव्हमेंट च्या वतीने राज्य कार्याध्यक्ष भरत शेळके, उपाध्यक्ष डाॅ.अशोक गायकवाड, सरचिटणीस प्रा.डाॅ.भरत नाईक,पद्मश्री सुधाकर ओलवे(छायाचित्रकार) व प्रभाकर कांबळे (चित्रकार) यांनी केले आहे.आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी "सेक्युलर मुव्हमेंट"मुंबई प्रदेशचे विनोद शिंदे,गौतम सांगळे,निलेश किटके,निलध्वज दाभाडे,आदि परिश्रम घेत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सेक्युलर मुव्हमेंट चे जिल्हा संघटक अॅड.मिलिंद सर्पे, राज्य सहसचिव प्रा.डाॅ.अंबादास कांबळे यांनी केले आहे.
------------------------------------------------
No comments:
Post a Comment