निवेदक उत्तम कानिंदे यांचा सिनेअभिनेत्री कविता मानकर यांचे हस्ते सत्कार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 28 December 2019

निवेदक उत्तम कानिंदे यांचा सिनेअभिनेत्री कविता मानकर यांचे हस्ते सत्कार


कुमार संपादक निवेदक उत्तम कानिंदे यांचा सिनेअभिनेत्री कविता मानकर यांचे हस्ते सत्कार

किनवट  : 
       स्वंयप्रणेने 'निवेदक न्यूज युट्यूब चॅनल' व 'निवेदक न्यूज वेबपोर्टल'
(www.nivedaknews.in) सुरू करून एक वर्षाच्या आत जगातील पंचेचाळीस देशातील सर्व भाषेत दोन लाख प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा पल्ला गाठल्याबद्दल इयत्ता नववीतील कुमार संपादक निवेदक उत्तम कानिंदे यांचा नाना पाटेकर यांच्या प्रहार चित्रपटात भूमिका साकारलेल्या प्रसिद्ध सिने अभिनेत्री कविता मानकर (मुंबई ) यांच्या हस्ते किनवट येथे साने गुरूजी जयंती व साने गुरुजी रुग्णालय वर्धापनदिन सोहळ्यात नुकताच सत्कार करण्यात आला.

            यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई बलसुस्कर, प्रसिध्द कथाकार ग्रंथमित्र दीपकराव बलसुरकर ( उदगीर ), हॅलो फाऊंडेशन सदस्य तथा प्रसिद्ध भूलरोग तज्ज्ञ डॉ. मारोती गायकवाड ( पुणे ), प्रसिध्द चित्रकार तथा कठपुतळी कलावंत अजय श्रीवास्तव ( मुंबई ) व प्रसिद्ध सिने पटकथाकार प्रकाश जाधव ( मुंबई ), प्रसिद्ध चित्रकार रणजीत वर्मा मंचावर उपस्थित होते.

            भारत जोडो युवा अकादमीचे संस्थापक डॉ. अशोक बेलखोडे यांचे हस्ते  उद्घाटन झालेल्या तालुका विज्ञान प्रदर्शनाचे  कुमार संपादक निवेदक याने मागील वर्षी यूट्युब चॅनलवरून लाईव्ह प्रसारण केले होते. त्यानंतर त्याने स्वयंप्रेरणेने 'निवेदक न्यूज युट्यूब चॅनल' व 'निवेदक न्यूज वेबपोर्टल'
(www.nivedaknews.in) सुरू केले. एका वर्षाच्या आत त्याला जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यास उज्ज्वल भवितव्याची प्रेरणा मिळावी म्हणून डॉ.बेलखोडे यांनी त्याचा सत्कार आयोजित केला होता.
________________________________

" मला हे करायचं. असं म्हणून स्वत : ठरवून जिद्दीनं आपलं क्षेत्र निवडून त्यात करिअर करायचं असा निर्धार करणारी जी मुलं असतात त्यातीलच एक निवेदक उत्तम कानिंदे. स्वयंप्रेरणेनं समाजमाध्यमात पदार्पण करून त्यानं अल्पावधीत गाठलेलं यश स्पृहणीय आहे. नव्या करिअरसाठी शुभेच्छा !
-डॉ. विलास ढवळे, नांदेड
                       ..........................


" इयत्ता नववीत शिकणारा निवेदक कानिंदे स्वतः छायाचित्रण, संपादन, प्रसारण सर्व काही उत्कृष्टरित्या करून सोशियल मिडियाच्या माध्यमातून जगासमोर व्यक्त होतोय हे अभिनंदनीय आहे.

-डॉ. बबन जोगदंड, यशदा, पुणे

  _______________________________

1 comment:

  1. निवेदकची कमी वयात उंच भरारी..
    पुढील वाटचालीस मंगल सदिच्छा !

    ReplyDelete

Pages