बार्टीचा संविधान साक्षरग्राम उपक्रम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 14 December 2019

बार्टीचा संविधान साक्षरग्राम उपक्रम

चिमूकल्यानी साकारल चित्रातून माझा गांव...

बार्टीचा संविधान साक्षरग्राम उपक्रम.
नांदेड :
जि.प.शाळा बोंढार हि राज्यात नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी चर्चेत राहिली आहे.ब्रिटीश कौन्सिल सोबत शैक्षणिक द्रुष्टीने जोडून हि शाळा देशभर चर्चेत आली.सध्या बोंढार हे गाव संविधान साक्षरग्राम म्हणून बार्टी ने निवड करुन या ठिकाणी विविध संविधान जग्रुतीचे उपक्रम राबवत आहे.
      यात शाळेचा मोठा सहभाग आहे.नुकतीच शाळेची शैक्षणिक सहल सामजिक वनीकरण ने विकसित केलेल्या बोंढार उद्यानात झाली.नैसगिर्क वातावरणात विद्यार्थ्यांनी मनमुराद बागडुन सहलीचा आनंद लुटला.याच ठिकाणी नैसर्गिक वातावरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांचा संविधान साक्षरग्राम उपक्रमच्या निमित्ताने माझे गाव विषय घेऊन चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.आपल्या गावाबद्द्ल, शाळे बद्द्ल आपुलकी असावी म्हणून हि स्पर्धा घेण्यात आली या वेळी रंग आणि रेषाच्या संगतीत चिमुकल्यानी आपल्या गावाची चित्र रेखाटली यात सर्वाच चित्रात प्रमुखाने दिसणारी गोष्ट होती शाळा.
   
      विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रात शाळा , ग्रामपंचायत , अंगणवाडी , मंदिर , रस्ते रेखाटले यातून शाळा आणि गावातील जिव्हाळा व्यक्त होत होता.या सहलीचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती लहाने , शिक्षिका श्रीमती तामगाडगे , शिक्षक नलवडे सर यांनी केले तर चित्रकला स्पर्धेचे नियोजन समतादूत अविनाश जोंधळे, विनोद पाचंगे , ज्योती जाधव , ज्योती जोंधळे , राणीपद्मावती बंडेवार , अमित कांबळे यांनी बार्टीचे महासंचालक कैलास कणसे , निबंधक यादव गायकवाड , मुख्यप्रकल्प संचालक प्रज्ञा वाघमारे, प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

No comments:

Post a Comment

Pages