ध्येयनिश्चित करून परिश्रम घेतले तर यश मिळते..
- डॉ.हनुमंत भोपाळे
नांदेड : प्रत्येकाला आयुष्य सुखी, यशस्वी व्हावं वाटतं. ध्येयनिश्चित करून यश मिळणारच आहे असा सकारात्मक विचार करून सातत्याने नियोजनबद्ध पद्धतीने परिश्रम घेतल्यास यश, सुख मिळते.क्षमता आणि कौशल्य असूनही आळस, नकारात्मक विचार,कुसंगत,न्यंनगंडाने पछाडलेली माणसं यशोगाथा निर्माण करू शकत नाहीत, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक तथा शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूरचे प्रभारी प्राचार्य डॉ हनुमंत भोपाळे यांनी केले.
ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व जयजवान जयकिसान बहुउद्देशीय संस्था,कवाना यांच्या संयुक्त विद्यमाने चक्रवर्ती अशोक हायस्कूल, पळसा (ता.हदगाव)येथे आयोजित 'व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी सूत्रे या विषयावर बहि:शाल व्याख्यानमालेत ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सौ.गंगमवार ए.व्ही. तर प्रमुख पाहुणे म्हणून कुबेर राठोड , सुनीता बुरांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ हनुमंत भोपाळे पुढे बोलताना म्हणाले, 'प्रेरणा प्रबळ असतील तर प्रभावी यश मिळते.प्रेरणेच्या बळावर अडचणीचे पर्वत हलवता येतात.ज्यांच्या प्रेरणा संपल्या, दुबळ्या असतात ते जागचेच हालत नाहीत.' विधायक प्रेरणा घेऊन वाटचाल करणारी माणसं नायक तर विनाशकारी प्रेरणा घेऊन वाटचाल करणारी माणसं खलनायक बनतात.नायक बनायचे असेल तर सकारात्मक भावना, विचार आणि कार्याची कास धरली पाहिजे . मनात सलणार-या प्रश्र्नांची उकल करण्यासाठी समुपदेशनाची नितांत गरज असते असेही डॉ हनुमंत भोपाळे यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना सौ.गंगमवार म्हणाल्या, अत्यंत प्रेरणादायी, सकारात्मक विचारांची पेरणी करणारे व्याख्यान ऐकून अत्यानंद झाला,अशा व्याख्यानामुळे खरंच माणूस सकारात्मक बनून विधायक वाटचाल करतो असे गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात दीपक सूर्यवंशी यांनी प्रेरणादायी सकारात्मक विचारांची पेरणी करणा-या व्याख्यानाची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास जावरकर
यांनी केले तर आभार कुबेर राठोड यांनी मानले. कार्यक्रमासह , वानखेडे श्यामकुमार, प्रकाश येलूतवाड, चिंचोलकर लालकृष्ण, लोहेकर गजानन, संदीप पाटील , विनोद निमडगे बुरडे महेश कैलास कौशल्य, यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment