जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 6 January 2020

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध


जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर  केलेल्या  प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध 

किनवट : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर काल रात्री केलेल्या  प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एस.एफ.आय.)चे माजी राज्य सहसचिव तथा माजी जिल्हाध्यक्ष अॅड.एम.यु.सर्पे यांनी केला आहे.

      विद्यापीठाच्या (जेएनयू) कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर बुरखाधारी हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला.यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या स्टुडंट युनियनच्या अध्यक्षा तथा एस.एफ.आय.च्या नेत्या आईशी घोष या गंभीर जखमी झाल्या आहेत.

    याप्रकरणी  आज सकाळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी पोलिसांकडे दाखल करण्यात आल्या होत्या. त्याआधारेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, बुरखाधारी हल्लेखोरांची ओळख पटल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या हल्लेखोरांची नावे मात्र अद्याप उघड करण्यात आलेली नाहीत.केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी जेएनयूतील हिंसाचाराच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दिल्लीचे नायब राज्यपाल तसेच पोलीस आयुक्तांकडे तातडीने याबाबत अहवाल मागितला आहे. दुसरीकडे एम्समध्ये दाखल करण्यात आलेल्या जखमी विद्यार्थ्यांना उपचारानंतर आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. एम्सकडून याबाबत एक बुलेटिन जारी करण्यात आले असून ३४ विद्यार्थी रुग्णालयात दाखल होते, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
    विद्यार्थी मुलींवर हल्ला, मुंबई आणि पुण्यातील विद्यापीठे तसेच देशभरात पडसाद उमटत आहे.
   दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटायला सुरुवात झाली असून या हल्ल्याविरोधात मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियावर अनेक महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी निदर्शनं केली.मुंबईबरोबर पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनीही रात्री पुण्यात जोरदार निदर्शनं केली.

 JNU मध्ये विद्यार्थी मुलींवर हल्ला, बॉलिवूड उतरले निषेधासाठी

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर बुरखाधारी हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला यात जेएनयु विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आइशी घोष ना जबर मारहाण करण्यात आली असून त्यांच्या  डोक्याची कवटी फुटल्याने तीव्र रक्तस्त्राव होत असल्याचे समजते. यात एक महिला शिक्षिका सुद्धा जखमी झाल्या आहेत.यामुळे चिडलेल्या बॉलीवूड कलाकारांनीही संताप व्यक्त   केला. अक्षयकुमारची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्नाने टोकदार ट्विट करत आरसा दाखवला आहे.ती म्हणते "या देशात विद्यार्थ्यांच्या तुलनेत गाई अधिक सुरक्षित आहेत,तुम्ही हिंसेने फारकाळ कुणाला दाबून ठेवू शकत नाही,जेवढी हिंसा तेवढा अधिक विरोध लोक रस्त्यावर उतरून करतील" तापसी पन्नूने ट्विट केले आहे."आपण विचार करतो अशा ठिकाणी आपलं भविष्य बनणार आहे,तीथे अधिक भयावह स्थिती आहे.असं नुकसान आहे ज्याची भरपाई होऊ शकत नाही.हे खूप दुर्दैवी अन दु:खद आहे" दिग्दर्शक अनुभव सिन्हा म्हणतात "सरकार सोबत बातचीत करणाऱ्या बॉलीवूडच्या मंडळींनी या घटनेबाबत सरकारला जाब विचारला पाहिजे.जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांवर अत्यचार करताय तेव्हा त्याचवेळी दुसरीकडे आम्हाला शानदार डिनर नाही देवू शकत" दिग्दर्शक अनुराग बासू  म्हणतात "आम्ही आता मूकदर्शक बनून नाही राहू शकत" अभिनेता रितेश देशमुख लिहितात "तुम्हाला तोंड लपवून हल्ले करायची वेळ का आली? कारण तुम्ही जाणता तुम्ही चुकीचे अन दंडनीय काम करत आहात.यात काहीही सन्मान नाही. गुंडांच्या द्वारे विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला सहन केला जाऊ नये" अभिनेत्री कृती सेनन -जेएनयु मध्ये जे झालं ते पाहून काळीज तुटलं आहे.भारतात जे सुरु आहे ते भयानक आहे.बुरखाधारी भेकडांच्यासाथीने विद्यार्थी आणि शिक्षकांना मारहाण करत दहशत निर्माण करणे हे राजकीय अजेंड्यासाठीच एवढा नीच खेळ खेळला गेला आहे.हिंसा हे समाधान नाही.आपण एवढे अमानवीय कसे काय झालो?" यासोबत नंदिता दास राजकुमार राव, विशाल भारद्वाज, जीशान अयूब, जावेद जाफरी और जेनेलिया देशमुख इत्यादी अनेक कलाकारांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला.
            हिंसाचाराविरोधात जेएनयूच्या साबरमती हॉस्टेलच्या वॉर्डनचा राजीनामा.राजीनामा देताना त्यांनी विद्यापीठ प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) हिंसाचारप्रकरणी विद्यापीठातील वसतिगृहाच्या वरिष्ठ वॉर्डन आर. मीना यांनी राजीनामा दिला आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी आमच्यावर होती. मात्र, आम्ही सुरक्षा पुरवू शकलो नाही, असे सांगत त्यांनी याची नैतिक जबाबदारी घेत राजीनामा दिला आहे.

No comments:

Post a Comment

Pages