भारतीय जनता पक्षाची किनवट पंचायत समितीवर पुन्हा एकदा सत्ता - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 6 January 2020

भारतीय जनता पक्षाची किनवट पंचायत समितीवर पुन्हा एकदा सत्ता


भारतीय जनता पक्षाची किनवट पंचायत समितीवर पुन्हा एकदा सत्ता..
सभापतीपदी हिराबाई लक्ष्मण आडे ,तर  उपसभापतीपदी कपिल करेवाड 

किनवट  : भारतीय जनता पक्षाने किनवट पंचायत समितीवर पुन्हा एकदा अडीच वर्षासाठी बिनविरोध सत्ता मिळवली आहे. सभापतीपदी हिराबाई लक्ष्मण आडे ,तर  उपसभापतीपदी कपिल करेवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आ.भीमराव केरामांच्या कुशल नियोजनामुळे हे सहज शक्य झाले आहे.विरोधी पक्ष सदस्यांनी सुद्धा पक्षभेद विसरुन विरोधासाठी विरोध न करता सौहार्दाचा संदेश दिल्याचे या निवडीतून पहावयास मिळाले.

        एकूण १२ सदस्य असलेल्या किनवट पंचायत समितीमध्ये भाजपा- ६, शिवसेना -१, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष- १, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-३ व अपक्ष- १ असे पूर्वी पक्षीय बलाबल होते. मागच्या अडीच वर्षाच्या काळात भाजपाच्या कलाबाई नारायण राठोड ह्या सभापती आणि उपसभापती म्हणून शिवसेनेचे गजानन कोल्हे हे होते. त्यावेळी भाजपा, शिवसेना व अपक्ष अशी सांगड घालून भाजपाने सत्ता काबीज केली होती. पुढील अडीच वर्षासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाला सभापतीपद आरक्षित झाल्याने, कसलीही रस्सीखेच न करता, जवळपास सर्वच सदस्यांनी सभापती म्हणून हिराबाई लक्ष्मण आडे आणि उपसभापतीपदी कपिल करेवाड यांच्या नावावर  सोमवारी (दि.६) शिक्कामोर्तब केला. आ.भीमराव केरामांनी पंचायत समितीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आणि एका आदिवासी महिलेला न्याय देण्यासाठी सर्वांना एकत्रित केले होते. सर्व सदस्यांनीही आ.केरामांच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने मैत्रीपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक अविरोध झाली.

          किनवट पंचायत समितीच्या सभागृहात आज सोमवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अभिनव गोयल हे होते. सहाय्यक म्हणून गटविकास अधिकारी सुभाष धनवे यांनी काम पाहिले. यावेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष अजय चाडावार, माजी नगराध्यक्ष दिनकर चाडावार, धरमसींग राठोड, माजी उपसभापती गजानन कोल्हे, नारायण दराडे, भगवान हुरदुखे, मारोती भरकड, अनिल तिरमनवार, नारायण राठोड, बाबुराव केंद्रे, गोविंद अंकुरवाड, संदीप केंद्रे, विवेक केंद्रे,  दत्ता आडे,  डॉ.नामदेव कराड, बालाजी आलेवार, उद्धवराव मुंडे, मारोती सुंकलवाड, गंगाधर तोटरे, मारोती दिवसे पाटील, प्रकाश करेवाड या मान्यवरांसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages