कमठाला येथिल जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सावित्रीच्या लेकिचा गौरव
किनवट: केंद्रीय प्राथमिक शाळा कमठाला येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त केंद्रांतर्गत कार्यरत सर्व महिला शिक्षिकांच्या सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी खुडे तर प्रमुख पाहुण्या म्हणून शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा श्रीमती बेबीताई बडेवाड ह्या होत्या.
सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर स्त्रीमुक्ती दिन तथा बालिका दिनानिमित्त केंद्रामध्ये कार्यरत सावित्रीच्या लेकी महिला शिक्षिकांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेतून याचवर्षी बदलून गेलेल्या शिक्षिका क्रांती सिरमनवार यांना निरोप देण्यात आला.
यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली यात रोहिदासतांडा येथील महाराष्ट्र शासन राज्यपुरस्कारप्राप्त शिक्षिका श्रीमती शालिनी सेलूकर यांनी व लोणी येथील मुख्याध्यापिका श्रीमती वर्षा कुलकर्णी यांनी आपले विचार मांडले.
शाळेतील काही विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर भाषणे केली. सातवीतील शुभांगी बडेवाड व शुभांगी तवरकर सहावीतील कांचन भोयर विद्यार्थीनींनी भाषणे केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शरद कुरूंदकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहीदासतांडा शाळेचे मुअ.प्रशांत शेरे यांनी केले तर आभार अंकुश राऊत मानले. यावेळी लोणीच्या वर्षा कुलकर्णी, विद्या श्रीमेवार , शाहीन बेग, गणेशपूर जूने येथील उर्मिला परभणकर, रोहीदासतांडा येथील शालिनी सेलूकर, गणेशपूर नवे येथील प्रेमिलाताई जाधव, झेंडीगुडा येथील अनुसया वाकोडे, कमठाला येथील धनरेखा सांगवीकर, भारती देवकते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment