महिलांनी आत्मनिर्भर बनून स्वतःची सुरक्षा स्वतःच करावी.. मंदार नाईक - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 4 January 2020

महिलांनी आत्मनिर्भर बनून स्वतःची सुरक्षा स्वतःच करावी.. मंदार नाईक



महिलांनी आत्मनिर्भर बनून स्वतःची सुरक्षा  स्वतःच करावी..

महिला व वाहतूक सुरक्षा कार्यक्रमात उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांचे प्रतिपादन

किनवट: पुढ्यात येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी महिलांनी आत्मनिर्भर बनून स्वतःची सुरक्षा स्वतःच करावी ; तर संभाव्य अपघात समस्या दूर करण्यासाठी सर्वांनी मेंदू, मनाची एकाग्रता साधून स्वनिर्णयक्षमता विकसीत करावी असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांनी केले.

               पोलिस स्टेशनच्यावतीने शुक्रवारी ( दि. ३ ) महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा येथे पोलिस स्थापना दिननिमित्त " महिला सुरक्षा व वाहतूक सुरक्षा " या विषयावर माहिती देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थासचिव अभियंता प्रशांत ठमके, प्राचार्य राजाराम वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे श्री नाईक वाहतूक सुरक्षा या विषयी बोलतांना म्हणाले की, वाहतूक अभियांत्रिकी व यांत्रिक वाहतूक या दोन नव्या शाखा अभियांत्रिकी विभागात सुरू झाल्या आहेत. या प्राप्त करून नगररचनाकार  शहराची उत्तम रचना करू शकतात.

               राष्ट्रपिता जोतीराव फुले व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पार्पूण कार्यक्रमास प्रारंभ झाला. पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विषद केली. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले.पर्यवेक्षक शेख हैदर यांनी आभार मानले. प्राचार्या शुभांगीताई ठमके व ज्योती शेरे यांनी महिला सुरक्षा या विषयावर सविस्तर माहिती दिली. महिला पोलिस कर्मचारी यांनी स्वतःची ओळख सांगत सर्व युवतींना २४ तास अडचणीवर मात करण्यासाठी संपर्क क्रमांक दिला.

        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  उपप्राचार्य सुभाष राऊत, उपमुख्याध्यापक जुम्माखान पठाण, पर्यवेक्षक संतोष बैसठाकूर, प्रा. रघुनाथ इंगळे, प्रा. संजय ढाले, महेंद्र नरवाडे, किशोर डांगे, प्रमोद मुनेश्वर यांचेसह जमादार पांडुरंग बोंडलेवाड, अप्पाराव राठोड, पोलीस कर्मचारी गजानन चौधरी, लखुळे, परमेश्वर गाडेकर, बोधमवाड, सुनील कोलबुधे, राजू पाटोदे, ज्ञानबा लोकरे, महिला पोलीस कर्मचारी रायलवड, शिंदे, गजलवार, कुऱ्हे, संदीप वानखेडे, सुरेश माने, नागनाथ जेठे, लक्ष्मण भालेराव, गंगाराम कनकावार, ज्योती पिलवार, संजीवनी मुनेश्वर आदींनी परिश्रम घेतले.



No comments:

Post a Comment

Pages