1057 विद्यार्थ्यांनी दिली जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश निवड चाचणी परीक्षा ; 52 गैरहजर
किनवट :
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश निवड चाचणी परीक्षेस किनवट तालुक्यातील तीन परीक्षा केंद्रावर नोंदणी केलेल्या 1109 विद्यार्थ्यांपैकी 1057 विद्यार्थी हजर होते; तर 52 विद्यार्थ्यांनी गैरहजर राहून दांडी मारली. भरारी व बैठे पथक तैनात केल्याने परीक्षा सुव्यवस्थित, शांततेत व सुव्यवस्थेत पार पडली. अशी माहिती या परिक्षेचे तालुका नियंत्रक तथा गटशिक्षणाधिकारी सुभाष पवने यांनी दिली.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश निवड चाचणी परीक्षा केंद्र क्रमांक एक : सरस्वती विद्यामंदीर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, किनवटसाठी मुख्याध्यापक जी.जी. पाटील केंद्र संचालक होते. येथे परिक्षेस बसलेल्या 500 विद्यार्थ्यांपैकी 483 परीक्षार्थी उपस्थित होते; तर 17 जण गैरहजर होते.
केंद्र क्रमांक दोन : महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदासाठी प्रशांत पत्तेवार केंद्र संचालक होते. येथे परिक्षेस बसलेल्या 500 विद्यार्थ्यांपैकी 471 परीक्षार्थी उपस्थित होते; तर 29 जण गैरहजर होते. केंद्र क्रमांक तीन : जवाहेरूल उलूम उर्दू हायस्कूल, किनवटसाठी मुख्याध्यापक मोहन जाधव केंद्र संचालक होते. येथे परिक्षेस बसलेल्या 109 विद्यार्थ्यांपैकी 103 परीक्षार्थी उपस्थित होते; तर सहा जण गैरहजर होते.
पंचायत समिती, किनवटचे गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका परीक्षा समन्वयक तथा केंद्रिय मुख्याध्यापक राम बुसमवार यांनी परिक्षेचे सुव्यवस्थापन केले. तसेच या परीक्षेसाठी भरारी पथक प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड यांनी; तर बैठे पथक प्रमुख केंद्रप्रमुख रमेश राठोड, रामा ऊईके व शिवाजी खुडे यांनी काम पाहिले. परिक्षेच्या यशस्वीतेसाठी डांगर , रमेश पवार , बालाजी इंदूरवार व शेख आयुब आदींनी सहकार्य केले.
Sunday 12 January 2020
1057 विद्यार्थ्यांनी दिली जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश निवड चाचणी परीक्षा
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment