मला मिळालेला आदर्श संसद पुरस्कार हिंगोली लोकसभा मतदार संघातील जनतेला समर्पित – खासदार हेमंत पाटील - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 30 January 2020

मला मिळालेला आदर्श संसद पुरस्कार हिंगोली लोकसभा मतदार संघातील जनतेला समर्पित – खासदार हेमंत पाटील

.


मला मिळालेला आदर्श संसद पुरस्कार  हिंगोली लोकसभा मतदार संघातील जनतेला समर्पित – खासदार हेमंत पाटील 
------------------------------------------------
किनवट : खासदार पदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून जनतेसाठी आजवर केलेल्या कार्याची पावती म्हणजे हा पुरस्कार आहे म्हणून हा पुरस्कार मी माझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या आणि मला भरघोस मताधिक्याने निवडून  देणाऱ्या हिंगोली लोकसभा मतदार संघातील सर्व जनतेला समर्पित करतो कारण त्यांच्यामुळे मला कार्य करण्याला संधी व ऊर्जा मिळाली आणि हि ऊर्जा या  पुरस्काराच्या निमित्ताने नक्कीच वाढली आहे अशी  भावना हिंगोली लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय व 'आदर्श खासदार ' हेमंत पाटील यांनी ५ व्या युवा संसद कार्यक्रमात पुणे येथे  व्यक्त केली.
               जाधवर ग्रुप ऑफ  इन्स्टिट्युटस् यांच्या वतीने आयोजित ५ व्या युवा संसद कार्यक्रमात खासदार हेमंत पाटील पुरस्काराला उत्तर देताना बोलत होते . ते म्हणाले कि , प्रचाराच्या रणधुमाळीपासून हिंगोली लोकसभा मतदार संघातील जनतेने माझ्यावर जीवापाड प्रेम करून  मला भरघोस मताधिक्याने निवडून दिले त्यांच्या याच प्रेमाच्या आणि आशीर्वादाच्या जोरावर मी संसदेत हिंगोली मतदार संघाच्या विकासाच्या दृष्टीने मागण्या मांडून मान्य करून घेऊ शकलो . त्यामुळे माझ्या मतदार संघातील जनतेचा मी सैदव ऋणी आहे आणि त्यांच्या आणि मतदार संघाच्या उन्नतीसाठी आजवर काम करत आलो आहे आणि पुढेही करत राहील केवळ पुरस्कारासाठी कार्य करायचे हि भावना कधीच मनात नव्हती आणि नसेलहि मतदार संघाचा विकास हा शुद्ध आणि निर्मळ हेतू डोळ्यासमोर ठेवून कार्य केले .राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारा मी एक शिवसैनिक आहे  आणि या उद्देशपूर्तीसाठी माझ्या हिंगोली लोकसभा मतदार संघातील जनतेने मतदानरुपी विश्वास दाखविला आहे .हा विश्वास मनात जागृत ठेवून  त्यांच्यासाठी शेवटपर्यंत कार्य  करत राहील असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले. 
             भारत देश महासत्ता होण्याच्या दिशेने झेपावत असताना देशातील युवा पिढीचा गांभीर्यांने विचार झाला पाहिजे कारण हि युवा पिढी आणि त्यांची श्रम शक्ती देशाला जागतिक स्तरावर घेऊन जाईल सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत या त्रिसूत्रीला एकत्र करून महामानवांच्या स्वप्नातील भारत नक्कीच घडेल यात दुमत नाही .  चीन, जपान या देशाकडे विकसित आणि महासत्ता म्हणून पाहतो यामागे नेमके काय कारण आहे  हे सुद्धा जाणून घेतेले पाहिजे या  देशातील लोकसंख्येचा,युवा शक्तीचा आणि त्यांच्या श्रमशक्तीचा योग्य  उपयोग  करून श्रम शक्तीचे रूपांतर अर्थशक्तीमध्ये झाले पाहिजे  म्हणूनच  ते देश आज जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत आहेत कारण त्या देशांनी जगाला शांतीचा  संदेश   देणारे गौतम बुद्ध यांची शिकवण  अंगिकारली असल्याचा दाखला त्यानी दिला . 
          देशात संशोधनावर नवनिर्माणावर भर देऊन खर्च झाला पाहिजे जेणेकरून अभ्यासू आणि  चांगल्या विचारांनि प्रेरित झालेली युवा पिढी घडेल  आणि खऱ्या अर्थाने देश महासत्ता होईल. तसेच  तुम्ही  प्रदान करत असलेल्या पुरस्कारांमुळे राजकारणात राहून चांगले काम करणाऱ्या पुढाऱ्यांना काम करण्यास प्रेरणा मिळते. असे म्हणून त्यांनी जाधवर ग्रुप चे आभार मानले. यावेळी  व्यासपीठावर माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील , प्राचार्य सुधाकरराव जाधवर, आ. राहुल कुल , खा. श्रीकांत शिंदे , खा. गजानन कीर्तिकार , नगरसेवक प्रशांत जगताप , पत्रकार महेश म्हात्रे , आदर्श युवा पुरस्कार प्राप्त रमणप्रीत  यांच्यासह आदि  मान्यवरांची उपस्थिती  होती .

No comments:

Post a Comment

Pages