देशासाठी महात्मा गांधी यांचे बलिदान - डॉ.हनुमंत भोपाळे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 30 January 2020

देशासाठी महात्मा गांधी यांचे बलिदान - डॉ.हनुमंत भोपाळे


महात्मा गांधी यांचे देशाच्या जडणघडणीत, स्वातंत्र्यसंग्रामात मौलिक असे योगदान..
 -डॉ.हनुमंत भोपाळे

नांदेड :
महात्मा गांधी यांचे देशाच्या जडणघडणीत, स्वातंत्र्यसंग्रामात मौलिक असे योगदान आहे. देशात शांतता, बंधुभाव वृध्दिंगत व्हावा म्हणून त्यांनी विचारांची पेरणी केली. त्यांच्या विचार आणि कार्याचा अभ्यास जगातील बहुसंख्य विद्यापीठात होतो, त्यांची प्रेरणा घेऊन आजही देशात आणि विदेशात अनेक मान्यवर देश सेवेचे काम करीत आहेत. त्यांचा त्याग प्रेरक असा आहे. त्यांच्या कार्याचा आजही जगभरात गौरव होतो ही बाब भारतीयांसाठी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक तथा शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूरचे प्रभारी प्राचार्य डॉ. हनुमंत भोपाळे यांनी केले. ते शंकरराव चव्हाण महाविद्यालयात हुतात्मा दिन तथा महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत बोलत होते.

प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी डॉ.साईनाथ शेटोड, डॉ.जे.सी.पठाण यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Pages