नांदेड जिल्हा वैभव पुरस्कार मिळाल्याबद्दल अभियंता प्रशांत ठमके यांचा गोकुंद्यात ह्रद्य सत्कार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 28 January 2020

नांदेड जिल्हा वैभव पुरस्कार मिळाल्याबद्दल अभियंता प्रशांत ठमके यांचा गोकुंद्यात ह्रद्य सत्कार





नांदेड जिल्हा वैभव पुरस्कार मिळाल्याबद्दल अभियंता प्रशांत ठमके यांचा गोकुंद्यात ह्रद्य सत्कार
किनवट   :
 महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा येथे विविध उपक्रमात प्राविण्य मिळवणाऱ्या यंशवंतांचा गौरव व शांभवीज् फाउंडेशनचा नांदेड जिल्हा वैभव पुरस्कार मिळाल्याबद्दल अभियंता प्रशांत ठमके यांचा ह्रद्यसत्कार कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला.
          केंद्र प्रमुख रमेश राठोड अध्यक्षस्थानी होते. संस्था सचिव सत्कारमूर्ती अभियंता प्रशांत ठमके, कोषाध्यक्ष प्राचार्या शुभांगी ठमके, राज्य पुरस्कार प्राप्त निवृत्त केंद्र प्रमुख रमेश चौधरी, प्राचार्य राजाराम वाघमारे, प्राचार्य भुवनलाल कावळे, गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचे उत्तम कानिंदे व राम बुसमवार हे प्रमुख अतिथी मंचावर उपस्थित होते.
          विविध स्पर्धा परिक्षेत जिल्हास्तरावर प्रथम येणारे, विविध शालेय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत अव्वल येणाऱ्या यशवंतांचा पालकांसह भेटवस्तू, प्रशस्ती -पत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
          आदिवासी, डोंगरी तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल शांभवीज् फाउंडेशन, नांदेडच्यावतीने बांधकाममंत्री अशोक चव्हाण, भारतीय नाट्य अकादमीचे माजी संचालकपद्मश्री वामन केंद्रे व सिने अभिनेते यांच्या हस्ते जिल्हा वैभव पुरस्कार मिळाल्याबद्दल मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्राचार्या शुभांगी ठमके, प्राचार्य राजाराम वाघमारे, प्रा.दारमवार, प्रा. अंजुम, प्राचार्य भुवनलाल कावळे, मुख्याध्यापक देवेंद्र दुबे, मुख्याध्यापक संजय सोनवणे, मुख्याध्यापक रवि भालेराव, वैशाली नरवाडे, अशोक सर्पे आदि संस्थेच्या सर्व युनिट प्रमुखांनी शाल, भेटवस्तू, बुके,पुष्पगुच्छ देऊन अभियंता ठमके यांचा सत्कार केला.
              राष्ट्रपिता जोतीराव फुले व राष्टूनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पार्पूण कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्राचार्य राजाराम वाघमारे यांनी प्रास्ताविकातून अभियंता प्रशांत ठमके यांनी केलेल्या भरीव शैक्षणिक प्रगतीमुळेच गोकुंद्याचं वैभव वाढलं असं मत व्यक्त केलं. अशोक भरणे, पर्यवेक्षक प्रा. संतोष बैसठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. प्रज्ञा पाटील यांनी आभार मानले.
              कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उप मुख्याध्यापक जुम्माखान पठाण, उपप्राचार्य सुभाष राऊत, पर्यवेक्षक महेंद्र नरवाडे, किशोर डांगे, अंबादास जुनगरे, प्रमोद मुनेश्वर यांनी परिश्रम घेतले.

" या संस्थेच्या वसतीगृहात राहून याच शाळेत शिकलेला गरीब मुलगा राहूल वाघमारे इस्त्रोत शास्त्रज्ञ झाला. याचा आम्हाला अभिमान आहे. अशाच प्रकारे येथील एक विद्यार्थी दिल्लीच्या एम्स मध्ये प्रविष्ठ झाला. असे अनेक विद्यार्थी डॉक्टर, अभियंते झाले. स्पर्धा परिक्षेतून अनेक प्रशासनात गेले. शैक्षणिक कार्या बद्दल मला मिळालेल्या पुरस्काराचे पालक, शिक्षक हेच खरे शिल्पकार आहेत, मानकरी आहेत. "
-अभियंता प्रशांत ठमके, सत्कारमूर्ती



No comments:

Post a Comment

Pages