१ व २ फेब्रुवारीला कोल्हापूर येथे दुसरे धम्म विचार साहित्य संमेलन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 17 January 2020

१ व २ फेब्रुवारीला कोल्हापूर येथे दुसरे धम्म विचार साहित्य संमेलन


१ व २ फेब्रुवारी २०२० रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे दुसरे धम्म विचार साहित्य संमेलन 

कोल्हापूर : धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापुरच्या वतीने दि. १ व २ फेब्रुवारी २०२० रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे दुसरे धम्म विचार साहित्य संमेलन होणार असून या निमित्ताने  ग्रंथ, शिल्प, चित्र आणि कविता प्रदर्शन महोत्सवाचेआ करण्यात आले आहे.

      या संमेलनास वंचित बहुजन आघाडीचे नेते  ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, श्रीमंत कोकाटे,  मा. म. देशमुख, शाहीर संभाजी भगत, डॉ. गेल ऑम्वेट, डॉ. भारत पाटणकर, धम्मचारी रत्नश्री, दिशा पिंकी शेख, डॉ. बाबुराव गुरव, डॉ.  विठ्ठल शिंदे, डॉ. रवींद्र श्रावस्ती, डॉ. सतीशकुमार पाटील, शाहीर रणजित कांबळे, गायक कबीर नाईकनवरे,  डॉ. अरुण गाडे, प्रा. कपिल राजहंस, प्रा. करुणा मिणचेकर, आर. एस. पांडे, डॉ. आंनदा गुरव, अनिल म्हमाने यांच्यासह अनेक मान्यवर कवी, लेखक, विचारवंत आणि कलावंत उपस्थित राहणार आहेत.

      दोन दिवस चालणाऱ्या या धर्म विचार साहित्यसंम्मेलनाच्या निमित्ताने ग्रंथ, शिल्प, चित्र आणि कविता यांचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. दोन दिवसांमध्ये कोल्हापूर सह महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक या प्रदर्शनास भेट देणार आहेत. या दोन दिवसीय प्रदर्शनाकरिता आपण आपले नाव आजच नोंद करावे.ऐनवेळी येणाऱ्यांना सहभागी होता येणार नाही.नाव नोंदणीकरिता संपर्क राहुल राजहंस(मोबाईल नंबर9823562801)व शांतीलाल कांबळे (9604681764) यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages