लोकशाही बळकटीसाठी युवकांनी नवमतदार म्हणून आपली नोंदणी करून प्रजाहिताची जबाबदारी पार पाडावी -तहसिलदार नरेंद्र देशमुख - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 25 January 2020

लोकशाही बळकटीसाठी युवकांनी नवमतदार म्हणून आपली नोंदणी करून प्रजाहिताची जबाबदारी पार पाडावी -तहसिलदार नरेंद्र देशमुखलोकशाही बळकटीसाठी युवकांनी नवमतदार म्हणून आपली नोंदणी करून प्रजाहिताची जबाबदारी पार पाडावी
-तहसिलदार नरेंद्र देशमुख


किनवट (ता. प्र.) :
लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान ही अत्यंत महत्वाची बाब. याची अंमलबजावणी फक्त मतदारच करू शकतात. तेव्हा युवकांनी नवमतदार म्हणून आपली नोंद करून प्रजाहिताची जबाबदारी पार पाडावी असे प्रतिपादन तहसिलदार नरेंद्र देशमुख यांनी केले.
         शनिवारी ( दि. २५ ) निवडणूक विभाग, तहसिल कार्यालयाच्या वतीने आयोजित 'राष्ट्रीय मतदार दिवस ' कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी नायब तहसिलदार महम्मद रफीक म.बशिरोद्दीन यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
         प्रारंभी शहरातील प्रमुख मार्गाने मतदार जागृती मशाल फेरी काढण्यात आली होती. तिचा समारोप तहसिल कार्यालयात झाला. आदिवासी मुलांचे पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.
         यावेळी मतदारयादी  पुन:रिक्षण कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणारे बीएलओ मारूती मुलकेवार, इमरान खान करीम खान, शोभा जाधव, सुनिता आडे, वैजंता कऱ्हाळे,मेजर साहेबराव चव्हाण यांना प्रशस्ती -पत्र प्रदान करण्यात आले.
         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज कांबळे, देवकते, कांबळे आदिंनी पुढाकार घेतला.

No comments:

Post a Comment

Pages