खा. हेमंत पाटील यांना युवा संसद चा ‘आदर्श खासदार ’ पुरस्कार ; २९ जानेवारीला पुण्यात होणार गौरव - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 25 January 2020

खा. हेमंत पाटील यांना युवा संसद चा ‘आदर्श खासदार ’ पुरस्कार ; २९ जानेवारीला पुण्यात होणार गौरव

खा. हेमंत पाटील यांना युवा संसद  चा ‘आदर्श खासदार ’ पुरस्कार ; २९ जानेवारीला पुण्यात होणार गौरव

किनवट : मतदार संघातील जनतेच्या समस्याना प्राधान्य देऊन सतत पाठपुरावा करत मागण्या मान्य करून घेत आणि या कार्यात सातत्य ठेवून अग्रेसर राहिल्याबद्दल हिंगोली लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटस् आयोजित  युवा संसदेच्या वतीने  आदर्श  खासदार पुरस्कार देऊन २९ जानेवारी रोजी पुण्यात गौरव होणार आहे .
                 हिंगोली लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय  खासदार हेमंत पाटील  यांनी खासदार पदाची जबाबदारी स्वीकारताच मतदार संघाच्या  विकास हाच एक ध्यास डोळ्यासमोर ठेवून  कामाला सुरवात केली आणि अवघ्या आठ  महिन्याच्या आत कामाचा आलेख उंचावत गेला मतदार संघातील रेल्वे प्रश्न , उद्योग व्यवसाय , शेतकऱ्यांचे प्रश्न पीकविमा कंपनीकडून होणारे शेतकऱ्यांची लूट आणि अडवणूक ,याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून जाब विचारला होता  आणि  अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान यासाठी भरीव नुकसान भरपाईची मागणी ,केली होती. यासह  हिंगोली येथे हळद प्रक्रिया उद्योग उभारण्यात यावे यासाठी केंद्रीय वाणिज्य स्थायी  समितीपुढे प्रभावीपणे केलेली मागणी होती , तर अवघ्या १ महिन्यात हिंगोली येथील एफ एम केंद्राला मंजूरी मिळून काम मार्गी लागले  , तसेच हिंगोली येथे ५० खाटांचे आयुष रुग्णालय उभारावे  यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन प्रभावीपणे मागणी  मांडली होती . तर हिंगोली लोकसभा मतदार संघातून  जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर मार्गी लावावे व प्रकल्पग्रस्तांना मावेजा तात्काळ देण्यात यावा याबाबत केंद्रीय  रस्ते वाहतूक मंत्र्यासोबत चर्चा केली मतदार संघाच्या या विकासकामाचा  धडाका लावून संसदेच्या आतापर्यंत झालेल्या सर्वच अधिवेशनात  नित्यनेमाने हजेरी लावून संस्कृत भाषा टिकण्यासाठी त्यावर अभ्यासपूर्ण मांडणी केली होती तर  ,स्वातंत्र्यं लढ्यात महत्वपूर्ण कामगिरी केलेल्या सर्वच घटकांची जपवणूक करण्यासाठी उपस्थित विधेयकावर  अभ्यासपूर्ण  मांडणी केली  ,मतदार संघात शेतमालाच्या साठवणूक करण्यासाठी उच्च क्षमतेचे शीतगृहे उभारावे . हिंगोली, नांदेड , यवतमाळ या  जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई , दिल्ली व देशाच्या इतर भागात ये जा करण्यासाठी नांदेड विमानतळाहून विमानसेवा नियमित करण्यात यावी यासह अनेक मागण्या मांडून मंजूर करून घेतल्या आहेत .हा एवढा कामाचा आलेख केवळ अवघ्या आठ महिण्याच्या असून संसदेत नियमित  उपस्थित राहून  प्रभावीपणे मांडल्या आहेत खासदार हेमंत पाटील यांच्या याच कार्याची दखल पुणे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस यांनी घेऊन येत्या २९जानेवारी रोजी आयोजित केलेल्या ५ व्या युवा  संसद कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श खासदार पुरस्कार देऊन गौरव  करण्यात येत आहे. जाधवर ग्रुप ही संस्था मागील अनेक वर्षापासून लोकप्रतींनिधींच्या कार्याची दखल घेवून त्यांना कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करत असते यंदा च्या पुरस्कारासाठी त्यांनी खासदार  हेमंत पाटील यांची निवड केली आहे. अवघ्या काही दिवसात  मतदार संघात  खासदार हेमंत पाटील यांची कर्तव्यदक्ष  व जनतेचा लोकप्रिय खासदार  म्हणून ओळख  निर्माण झाली आणि त्याच्या कार्याची दखल घेऊन खासदार हेमंत पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबाबद्दल मतदार संघात आनंद व्यक्त होत आहेत .

No comments:

Post a Comment

Pages