किनवटमध्ये प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम उत्साहात साजरा
किनवट : प्रजासत्ताक दिनानिमित्त उपविभागीय अधिकारी कार्यालय, किनवट येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते झाल्यानंतर सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक विद्यालयाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या ' भारत हमसे जानसे प्यारा है ' नाटिका व 'देश... रंगीला... रंगीला... ' या देशभक्ती नृत्याने किनवटमध्ये प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम दणाणला.
याप्रसंगी सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, शुभी गोयल, आमदार भीमराव केराम, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, तहसिलदार नरेंद्र देशमुख, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपाध्यक्ष अजय चाडावार आदी मान्यवरांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालक उत्तम कानिंदे यांनी ध्वजवंदनाच्या पूर्वी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन घेतले.
यावेळी मतदार यादी पुन:रिक्षण कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणारे बीएलओ मारूती मुलकेवार, इमरान खान करीम खान, सुनिता आडे, वैजंता कऱ्हाळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती -पत्र प्रदान करण्यात आले. त्यानंतर 'पोलिस रेसिंग डे ' निमित्त पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेतील यशवंतांना प्रशस्ती-पत्र व परिक्षक कलाध्यापक रमाकांत गायकवाड, शिवराज बामणीकर, रमेश मुनेश्वर, व्ही.बी. दहेकर, प्रा. गजानन सोनोने, स्पर्धा संयोजक प्रा.डॉ. सुनिल व्यवहारे व उत्तम कानिंदे यांना प्रशंसा पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
जुम्माखान पठाण यांचे मार्गदर्शन व अंकुश मुळे यांच्या नेतृत्वात महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, गोकुंदाच्या विद्यार्थिनींनी शानदार लेझिम व किनवट कराटे असोसिएशनच्या वतीने कराटे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नायब तहसिलदार महम्मद रफीक, अव्वल कारकून एस.व्ही.पांडे, के.डी. कांबळे, अशोक कांबळे, अनिल सूर्यवंशी, शिवकांता होनवडजकर, नामदेव धोंड, खंडेराव मॅकलवार, केंद्रिय मुख्याध्यापक राम बुसमवार, आदिंनी पुढाकार घेतला.
पंचायत समिती, किनवट येथे ध्वजवंदन
पंचायत समिती, किनवट येथे सभापती हिराबाई आडे यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी उपसभापती कपील करेवाड, माजी उपसभापती गजानन कोल्हे पाटील, गट विकास अधिकारी सुभाष धनवे, राज्य पुरस्कार प्राप्त निवृत्त केंद्र प्रमुख रमेश चौधरी, निवृत्त ग्रामसेवक दशरथ भगत यांचेसह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उत्तम कानिंदे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन घेतले.
गट शिक्षणाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन
येथील गट साधन केंद्रात गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. केंद्रप्रमुख के.व्ही. पाठक यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन घेतले. यावेळी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, विषय तज्ज्ञ, सर्व कार्यालयीन कर्मचारी वृंद पांची उपस्थिती होती.
जि.प. प्रा. कन्या शाळा, किनवट येथे ध्वजवंदन व बक्षीस वितरण
किनवट येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत मुख्याध्यापक जीवन गुरनुले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी इयत्ता तिसरीतील शेख राहत शेख शफी या विद्यार्थ्याने उर्दूतुन ( भारत का आईना ) संविधान उद्देशिकेचे वाचन घेतले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख फरीद शेख बाबन,पालक शेख सत्तार
सययद अकबर, केंद्र प्रमुख रमेश राठोड, निलावती गरूड, मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी यांचे हस्ते सर्व विद्यार्थ्यांना पारितोषीके वाटप करण्यात आली. बालभारतीचे सदस्य केंद्र प्रमुख वैजनाथ काळे, शिवाजी खुडे, विजय मडावी, प्रकाश होळकर आदिंनी शाळेस भेट देऊन कौतुक केले. यावेळी सर्व शिक्षक आयुब गंभीर, उमाकांत मॅकलवार, मोहम्मद अफजल, सुनिल इंगोले, माजी नगरसेवक बापूराव उपस्थित होते.
किनवट न्यायालयात...
किनवट दिवाणी व फौजदारी न्यायालयात सकाळी आठ वाजता सहदिवाणी न्यायाधिश जे.एन.जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.यावेळी वकील संघाचे अध्यक्ष पंजाब गावंडे, उपाध्यक्ष मिलिंद सर्पे,सचिव दिलीप काळे, सहसचिव,राहुल सोनकांबळे, जेष्ठ वकील अनंत वैद्य,शंकर राठोड,टी.एच.कुरेशी,सरकारी वकील अशोक पोटे, सहाय्यक सरकारी वकील श्री.चव्हान, यांच्यासह वकील, न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment