सामान्य लोकांच्या हितासाठी पत्रकार व लोकप्रतिनिधींनी काम करण्याची गरज : पालकमंत्री अशोकराव चव्हाण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 26 January 2020

सामान्य लोकांच्या हितासाठी पत्रकार व लोकप्रतिनिधींनी काम करण्याची गरज : पालकमंत्री अशोकराव चव्हाण

.

सामान्य लोकांच्या हितासाठी  पत्रकार व लोकप्रतिनिधींनी काम करण्याची गरज : पालकमंत्री अशोकराव चव्हाण

नांदेड:
स्नेह संमेलन पेक्षा आपले जवळचे संबंध आहेत.आपले व्यक्तिगत नाते आहेत. ते वृंधिगत व्हावेत यासाठी हा स्नेह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सर्व सामान्यांना चांगले दिवस आणण्याची जबाबदारी तुमची आणि आमची आहे. सत्तेचा फायदा सामान्य लोकांच्या हितासाठी व्हावा ही माझी आपेक्षा आहे. असे मत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.

प्रजासत्ताक दिनानमित्त आज नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांचे स्नेहसमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री अशोकराव चव्हाण बोलत होते.
पुढे बोलताना पालकमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले,मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शंकरराव चव्हाण यांच्याशी मुंबई व दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकारांशी चांगले संबंध होते. ही बाब लक्षात घेवून राज्यातील पत्रकारांसाठी कल्याण निधी योजना सुरू केली होती. त्याचा फायदा अनेक पत्रकार बांधवांना झाला आहे. हे समाधानाची बाब आहे.

सगळ्यांनी आमच्या बद्दल सदैव चांगले लिहावे असे नाही जे सत्य आहे ते छापले असेल तर त्यातूनही काही घेण्याचा व झालेली चूक सुधारण्याचा आमचा प्रयत्न असतो.तुमचं प्रेम कायम आमच्यावर असावे अशी आपेक्षा आहे. पत्रकारांच्या हिताच्या व लेखणीच्या आड आपले सरकार येणार नाही . लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही पत्रकारांचा सन्मान कायम राखतो असेही पालकमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले. अक्रेदेशनाच्या अटी शिथील करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत्री चव्हाण यांनी दिली.

यावेळी पत्रकार संघाचे विश्वस्त एस. एम. देशमुख, माजी मंत्री डी पी सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, माजी आ. अमिता चव्हाण, माजी आ. वसंतराव चव्हाण, माजी आ. हणमंतराव पा. बेटमोगरेकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगारानी. अंबुलगेकर, महापौर दीक्षा धबाले, जिल्हा अध्यक्ष गोविंदराव नागेलीकर,मराठी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नीलेश पवाडे , यांच्यासह नांदेड शहरातील विविध वर्तमान
पत्राचे संपादक, जिल्हा प्रतिनिधी , टी. व्ही. चॅनलचे पत्रकार उपस्थित होती.

आ. अमरनाथ राजूरकर यांनी प्रास्ताविक मांडताना म्हणाले, पत्रकारांसाठी आरोग्य विमा, अक्रेडेशन चा प्रश्न मार्गी लावावा पत्रकारांच्या विविध समस्या सोडवाव्यात अशी अपेक्षा त्यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासमोर व्यक्त केली.
यावेळी बोलताना विश्वस्त एस एम देशमुख म्हणाले अशा पद्धतीचे मेळावे प्रत्येक जिल्ह्यात झाले पाहिजेत. यामुळे राजकारणी व पत्रकार यांचे संबंध सुधारतील. एकमेकांविषयी असलेले गैर समाज दूर होतील असेही देशमुख म्हणाले.पत्रकारांनी आपल्यातील मतभेद विसरून एकत्र येवुन आपले प्रश्न सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन देशमुख यांनी केले.सूत्रसंचालन संतोष पांडागळे , प्रकाश कांबळे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Pages