सदाशिव गच्चे यांना राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार जाहीर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 26 January 2020

सदाशिव गच्चे यांना राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार जाहीर

सदाशिव गच्चे यांना राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार जाहीर

नांदेड - युगंधर क्रिएशन, वंदना संघ दीक्षाभूमी, व लॉर्ड बुद्धा मैत्रीसंघ नागपूरच्या वतीने दिला जाणारा अतिशय प्रतिष्ठेचा "डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार" लॉर्ड बुद्धा टी.व्ही.चे नांदेड जिल्हा प्रतिनिधी मा.सदाशिव गच्चे (94217 56663) यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती संयुक्त पुरस्कार निवड समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
       
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 मध्ये काढलेल्या "मूकनायक" या वृत्तपत्राला शंभर वर्षे पूर्ण होत असल्यामुळे पत्रकरितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यभरातील पत्रकारांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारीता पुरस्कार देवून युगंधर क्रिएशन नागपूर, वंदनासंघ दीक्षाभूमी, नागपूर व लॉर्ड बुद्धा मैत्रीसंघ नागपूरच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे. यावर्षीचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्कार लॉर्ड बुद्धा टी.व्ही.चे नांदेड जिल्हा प्रतिनिधी सदाशिव गच्चे यांना जाहीर झाला असुन मा.सदाशिव गच्चे यांनी लॉर्ड बुद्धा टी.व्ही. या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षाहून अधिक काळापासुन पत्रकारिता, सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक व संगित क्षेत्रात  दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल मा.सदाशिव गच्चे यांचा येत्या 31जानेवारी 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता  नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर  मान्यवरांच्या हस्ते मा.सदाशिव गच्चे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
   
मा.सदाशिव गच्चे यांना राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्धल मराठी पत्रकार परिषद मुंबईचे विभागीय सचिव प्रकाश कांबळे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव सुभाष लोणे, नमस्कार महाराष्ट्रचे संघरत्न पवार, स्वामी रामानंद विद्यापीठ माध्यम संकुलाचे प्रा.राजेंद्र गोणारकर,शिक्षक व कर्मचारी संघटनेचे केंद्रीय जिल्हाध्यक्ष बालासाहेब लोणे, साहित्यिक भीमराव हाटकर, राहुल जोंधळे, महाविहार परिवाराचे साहेबराव पुंडगे आदींनी सदाशिव गच्चे यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages