बौद्ध धम्म स्विकारणा-या पहील्या महीला: डॉ.सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 27 January 2020

बौद्ध धम्म स्विकारणा-या पहील्या महीला: डॉ.सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर

बौद्ध धम्म स्विकारणा-या पहील्या महीला: डॉ.सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर

डॉ. सविता  या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वितीय पत्‍नी व व्यवसायाने एमबीबीएस डॉक्टर होत्या. आंबेडकरानुयायी त्यांना आईची उपमा देत त्यांना माई किंवा माईसाहेब नावाने संबोधतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधान लिखाणाच्या काळात, हिंदू कोड बिल आणि त्यांच्या धर्मांतराच्या निर्णयाच्या वेळी, माईसाहेब बाबासाहेबांच्या साथीला होत्या .माई तथा माईसाहेब  शारदा भीमराव आंबेडकर यांचा जन्म जानेवारी २७, १९०९
 पुण्यात  झाला .माई आंबेडकर यांचे २९ मे २००३ रोजी  वयाच्या ९४ व्या वर्षी मुंबईतीळ जे जे रुग्णालयात निधन झाले . त्यांच्या  वडीलाचे  नावकृष्णराव कबीर असे होते .आईचे नावजानकी असे होते . त्यांचे माहेरचे नाव शारदा कबीर होते. त्यांचे घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील दोरला गावचे होते. त्यांचे वडील कृष्णराव कबीर इंडियन मेडिकल काउन्सिलचे रजिस्ट्रार होते. कृष्णरावांना पाच मुली आणि  तीन मुलगे होती. या एकूण आठ मुलांपैकी  सहा भावंडांचा विवाह आंतरजातीय झाला, इतके ते त्या काळातही पुरोगामी विचाराचे होते. याबद्दल माईसाहेबांना मोठा अभिमान वाटे.

शारदा ह्या विद्यार्थिदशेत अत्यंत हुशार होत्या. त्यांनी आपले शालेय शिक्षण पुण्यात घेतले व नंतर मुंबईच्या ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरीसाठीची एम.बी.बी.एस ही पदवी मिळवली. त्या महाविद्यालयाच्या वसतिगृहात असतांना अभ्यास नि आपण एवढीच त्यांची दिनचर्या होती. या वसतिगृहासमोरच असलेल्या ‘मणिभवन’ येथे १४ ऑगस्ट १९३१ रोजी बाबासाहेब आंबेडकरांची महात्मा गांधीशी मोठी खडाजंगी झाली होती. पण त्या भेटीसंबंधी त्यांना वसतिगृहात असूनही काहीच माहिती नव्हती. त्यांचे एम.डी.च्या परीक्षेचे पेपर्स अत्युत्तम गेले. पण ऐन प्रॅक्टिकल परीक्षेच्या वेळी त्यांना टायफाॅईड, डिहायड्रेशन, बॉईल्स असे आजार झाले व त्यांचे एम.डी. होणे राहून गेले. याच काळाच त्यांनी वैचारिक पुस्तकांचे वाचन केले.
डॉ. आंबेडकर आणि सौ. डॉ. आंबेडकर
शारदा कबीर यांनी गुजरातमध्ये काही काळ चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून एका हॉस्पिटलमध्ये काम केले, नंतर त्या मुंबईत आल्या आणि निष्णात फिजिओथेरपिस्ट, नामवंत सल्लागार व तज्ज्ञ डॉक्टर अशा मालवणकरांबरोबर काम करू लागल्या. तेथे १९४७ मध्ये  त्यांची आणि रक्तदाबाच्या आणि मधुमेहाच्या विकाराने ग्रस्त असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली. त्यापूर्वी डॉ. राव यांच्या घरी त्यांची भेट झाली होती. डॉ. आंबेडकरांची पहिली पत्‍नी रमाबाई आंबेडकर यांचे २७ मे १९३५ रोजी निधन झाले होते. त्यानंतर बाबासाहेबांनी प्रकृतीच्या कारणामुळे डॉक्टर असलेल्या शारदा कबीर यांचेकडून वैद्यकीय सेवा घेतली.

मुंबईच्या विलेपार्लेमध्ये राहणारे डॉ. एस. राव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घनिष्ठ संबंध होते. तसेच डॉ. शारदा कबीर यादेखील डॉ. राव यांच्या घरी येत जात असत. कारण त्यांच्या मुली आणि शारदा मैत्रिणी होत्या. त्यांच्याच घरी १९४७ मध्ये शारदा कबीर आणि बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली भेट झाली, त्यावेळी राव यांनी त्या दोघांची एकमेकांशी ओळख करून दिली.
 बाबासाहेब व माईसाहेब
आंबेडकर जेव्हा जेव्हा मुंबईला येत तेव्हा ते डॉ. मालवणकरांच्या कन्सल्टिंग रूमवर प्रकृतीच्या तपासणीसाठी जात. मालवणकरांनी आंबेडकरांना अनेक पथ्ये आणि औषधांबाबत अनेक सूचना दिल्या होत्या. आंबेडकरांना या गोष्टी जमण्यासारख्या नसल्याने डॉ. कबीर यांनी ‘एखादी नर्स ठेवा किंवा मी तुमच्याकडे काही दिवस राहून बाईंना (सौ. आंबेडकरांना) सर्व समजावून सांगेन’, असा सल्ला दिला. डॉ. शारदा कबीर यांना तेव्हा रमाबाईंच्या निधनाबाबत माहिती नव्हती. पुढे बाबासाहेब आंबेडकर एकदा डॉक्टर मालवणकरांच्या कन्सल्टिंग रूमवर आले असताना डॉ. कबीर त्यांना पथ्यपाण्याबाबत सांगू लागल्या. अखेर त्यांना बाबासाहेब म्हणाले, ‘अहो पण माझ्या घरात बाईमाणूस नाही, मी अगदी एकटा आहे, हे सर्व कोणाला सांगू?’. त्यावेळी डॉ. शारदा यांना आंबेडकरांच्या एकाकीपणाबाबत समजले. त्यानंतर दोघांची पुन्हापुन्हा भेट होऊ लागली. डॉक्टर आणि पेशंट म्हणून डॉ. आंबेडकरांशी त्यांचे नाते घट्ट झाले होते. त्यावेळी ‘कोणी मला माझे बाबासाहेबांशी लग्न होईल, असे सांगितले असते, तर मी ते कधीही मान्य केले नसते’, असे डॉ. माईसाहेब स्पष्टपणे कबूल करतात. मात्र त्यांच्या मनात बाबासाहेबांविषयी अत्यंतिक आदर आणि सहानुभूती होती.

एकदा  १९४७ च्या डिसेंबरमध्ये बाबासाहेब डॉ. मालवणकरांच्या कन्सल्टिंग रूमवर गेले असताना बाबासाहेबांनी शारदा यांना म्हणाले, ‘चला, मी तुम्हाला घरी सोडतो, मलाही राजगृहाला जायचे आहे.’ त्यापूर्वीही अनेकदा आंबेडकर आणि शारदा कबीर एकत्र बसून बोलायचे. अनेक विषयांवर त्यांच्या चर्चा व्हायच्या. या भेटींमुळे बाबासाहेबांबद्दल सविता यांना बरीच सखोल माहिती मिळाली होती. त्यातून त्यांच्या मनातील आदर अ

No comments:

Post a Comment

Pages