अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 25 January 2020

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी


किनवट : नियतक्षेत्र सिरमेटी(ता.किनवट) अंतर्गत येत असलेल्या भीमपूर गावातील रहिवासी शिवाजी भीमराव आत्राम (वय २५)  हा शेतामध्ये गवत कापतांना वन्य प्राणी अस्वलाने  अचानकपणे त्याच्यावर हल्ला करून त्याला जखमी केले.ही घटना काल(दि.२४) घडली.  
    जखमी अवस्थेत मेश्राम यास उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे उपचारा साठी दाखल केले.  जखमीस तात्पुरत्या स्वरूपात के. जी.  गायकवाड, वनपाल, किनवट यांनी पाच हजार रुपये तात्काळ मदत म्हणून मेश्राम यास दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक, किनवट यांच्या आदेशान्वये उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे वनपाल, किनवट  के.जी. गायकवाड,   वनरक्षक संभाजी  घोरबांड,  एन. के. चुकलवार,  एस. आर. पवार, वनमजूर  शेख रफिक  यांनी भेट दिली व  जखमींची विचारपूस करून  पुढील उपचारासाठी त्यास आदिलाबाद येथे पाठवून देण्याची व्यवस्था केली.

No comments:

Post a Comment

Pages