माहूर येथे बंद यशस्वी ; तहसिलदाराला दिले निवेदन..
माहूर: वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बहूजन ह्रदयसम्राट, आदरणीय अँड प्रकाश आंबेडकर साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र बंद पुकारला होता. त्या अनुषंगाने माहूर तालुका वंचित बहुजन आघाडी सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, संभाजी ब्रिगेड माहूर, शहिद टिपू सुल्तान संघटना, संविधान बचाव संघर्ष समिती, भिम टायगर सेना, यासोबतच वेगवेगळ्या धर्मनिरपेक्ष ३५ संघटणांनी या CAA NRC आणि NPR कायद्याच्या विरोधात रँलीला पाठिंबा देऊन, माहूर येथील व्यापारी बांधवांनी सुद्धा आपआपली प्रतीष्ठाने बंद ठेवून सहकार्य केले.
माहूरचे तहसीलदार मा. सिद्धेश्वर वरणगावकर साहेबांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालूकाध्यक्ष श्री मेघराज जाधव साहेब, संभाजी ब्रिगेड चे तालूका अध्यक्ष विशाल पाटील शिंदे, संविधान बचाव संघर्ष समितीचे व माजी नगराध्यक्ष श्री. फिरोज दोसाणी साहेब, भिम टायगर सेनेचे तालूकाध्यक्ष श्री राहूल सावित्रीबाई पुंडलिक भगत, एम आय एमचे तालूका अध्यक्ष सिराजभाई, शहीद टिपू सुल्तान संघटनेचे तालूका अध्यक्ष लतिफ शेख, किशान ब्रिग्रेड माहूर तालूकाध्यक्ष अविनाश टणमने, वाई सर्कल भारिप बहूजन महासभाचे अध्यक्ष सुशिल रणविर, भारिप बहूजन महासभेचे माहूर तालूकाध्यक्ष सुरेश आत्राम, ता. उपाध्यक्ष विजय भगत, भारिप बहूजन महासभेचे उपाध्यक्ष अनाथपिंडक खंदारे, सुजात पारधे, विवेक लोखंडे, आदित्या खंदारे, विजय खडसे, गौतम खडसे, विनोद बरडे, पत्रकार सामाजिक कार्यकर्ते सिध्दार्थ तामगाडगे, मंगेश गायकवाड आदिंची सहभाग नोंदविला होता. आणि बंद हा यशस्वी पणे पाळण्यात आला.
No comments:
Post a Comment