तक्षशिला बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन उत्साहात साजरा
किनवट : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाम विस्तार दिन काल(दि.१४) सकाळी नऊ वाजता विद्यानगर, गोकुंदा (ता.किनवट)येथील तक्षशिला बुद्ध विहारात उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी दादाराव कयापाक, मिलिंद सर्पे, हरी दर्शनवाड, शाहीर नरेंद्र दोराटे व प्रसिद्ध गजलकार मधु बावलकर, प्रा.डाॅ.पंजाब शेरे यांचा समाजबांधवांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
प्रारंभी रिपाइं चे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक यांनी धम्मध्वजारोहन करुन नामांतर चळवळीतील योगदानाबद्दल माहिती सांगितली. बुद्ध वंदना महेंद्र नरवाडे व सागर शेंडे यांनी घेतली. अशोक भरणे यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले. कार्यक्रम घडवून आणण्यासाठी प्राचार्य राजाराम वाघमारे, उपप्राचार्य सुभाष राऊत, दिलीप पाटील यांनी पुढाकार घेतला.
No comments:
Post a Comment