कलावंतांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बहुजन टायगर युवा फोर्सच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर भजन आंदोलन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 15 January 2020

कलावंतांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बहुजन टायगर युवा फोर्सच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर भजन आंदोलनकलावंतांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बहुजन टायगर युवा फोर्स आक्रमक
कर्मचारीवर्गाच्या 'त्या' नियमबाह्य प्रतिनियुक्त्या रद्दचीही मागणी; जिल्हापरिषदेसमोर शुक्रवारी भजन आंदोलन

नांदेड :
       वृध्द मान्यवर कलावंतांच्या विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासह जिल्ह्यातील कर्मचारीवर्गांच्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या व अतिरिक्त कार्यभार रद्द करण्यासाठी बहुजन टायगर युवा फोर्स पून्हा आक्रमक बनली असून दि.17 जानेवारीला जिल्हा परिषद,नांदेड कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष ञिरत्नकुमार मा.भवरे यांनी दिला आहे.
          कलावंतांच्या मानधनात वाढ करावी,मोफत घरकुल द्यावे,कलावंतासह त्यांच्या पाल्यांना एस.टी.बस व रेल्वे प्रवासात सवलत द्यावी,पाल्यांना मोफत शिक्षण द्यावे, जिल्हास्तरिय कलावंत व साहित्यीक मानधन निवड समितीमध्ये अनुभवी व वृद्ध कलावंतांचीच निवड करावी,समान पद्धतीने तालुक्यातून मानधनासाठी निवड व्हावी आदी मागण्या करण्यांत आलेल्या आहेत.
        बांधकाम दक्षिण विभागातील मुखेड तालुक्यात कार्यरत असलेले शेख फारुख पाशा या शाखा अभियंत्यास नियमबाह्यपणे उत्तर विभागाच्या हदगांव तालुक्यात दिलेला अतिरिक्त कार्यभार रद्द करण्याचा आदेश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांनी पून्हा दि.2 डिसेंबर रोजी दिल्यानंतरही कार्यकारी अभियंता करपे यांनी या आदेशाचा अवमान करुन त्यांना पाठीशी घातल्याने या प्रकरणासह त्यांच्या कार्यकाळातील सर्व कामांची उच्चस्तरिय चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी.
           तसेच, महत्वाच्या आरोग्य विभागासह सर्वच विभागामध्ये जिल्ह्यात सर्वञ विशेषतः किनवट व माहूर तालुक्यातून अधिकारी व कर्मचारी मूळ पदस्थापनेवर कर्तव्य बजावण्याऐवजी विविध कारणे दर्शवून स्थानिक वरिष्ठांच्या संगनमताने जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय ईमारतीत वा आर्थिक हितांच्या ठिकाणी नियमबाह्यपणे वर्षानूवर्षे तोंडी वा स्थानिक वरिष्ठांच्या मर्जीवरुन  प्रतिनियुक्ती,अतिरिक्त कार्यभारावर कामकाज पाहत असल्याने त्यांच्या मूळपदस्थापनेच्या जागा जणू रिक्तच असल्याचे कामावर मोठा परिणाम होत आहे परंतू,तात्पुरती स्थगिती पून्हा जैसे थे परिस्थितीमूळे  जिल्ह्यातील नियमबाह्य प्रतिनियुक्त्या,अतिरिक्त कार्यभार तात्काळ रद्द करावेत अनेकदा रद्द नंतरही मूळ पदस्थापनेवर कर्तव्य न बजावणारेंवर शासकीय सेवेतून बडतर्फीची कारवाई करावी या दोन्ही मागण्यांसाठी यापूर्वी दि.2 मार्च 2019 रोजी भजन आंदोलनावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार जवळगांवकर यांनी भजन आंदोलनस्थळी कलावंतांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती.तसेच,संबधित विभागालाही समक्ष निर्देश दिले होते.माञ कागदोपञी सोपस्कार पूर्ण करुन जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन व समाजकल्याण विभागाने सातत्याने पाठपुरावा व प्रसंगी आंदोलनानंतरही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित असल्याचा आरोप करुन जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रलंबित मागण्या तात्काळ मार्गी लावाव्यात अन्यथा दि.17 जानेवारीला बहुजन टायगर युवा फोर्सच्यावतिने भजन आंदोलन करण्यांत येणार असल्याचा इशारा संबधितांना देण्यांत आला असून जिल्हाभरातून शाहिर,कवी-गायक व सर्व स्तरातील कलावंतांनी यावेळी सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष ञिरत्नकुमार मा.भवरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages