नववर्षानिमित्त व्यसन व नशेली अंमली पदार्थांच्या राक्षसाचे दहन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 2 January 2020

नववर्षानिमित्त व्यसन व नशेली अंमली पदार्थांच्या राक्षसाचे दहन



अन्याय अत्याचार निर्मुलन समिती नाशिक जिल्हा व शहर पदाधिकाऱ्या वतीने व्यसन व नशेली अंमली पदार्थांच्या राक्षसाचे दहन करण्यात आले

नाशिक - नासिक या ठीकाणी सालाबादाप्रमाणे अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या जिल्हा व शहर कार्यकारिणीच्या वतीने मादकद्रव्य नशेली व अंमली पदार्थांच्या राक्षसी प्रतिकृती (विडी, गुटका, सिगारेट,तं  दारु,चरस, भांग,गांजा)  ई. चे दहन रविवारी ( दि.३१) नववर्षाच्या प्रारंभी मध्यरात्री समितीचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र दादा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.


या वेळी "आम्ही सालाबादाप्रमाणे कुठल्याही प्रकारची अंमली पदार्थांचे  व मादक द्रव्याचे सेवन करीत नव्हतो व या पुढे ही  करणार नाही.आम्हाला कुठल्याही प्रकारचे व्यसन करतांना किंवा केल्यानंतर पकडल्यास एक लाख रुपये बक्षीस जाहीर करतो अशी व्यसनमुक्तीची सामुहिक  शपतग्रहन प्रतिज्ञा मा.रविंद्रदादा जाधव यांच्या समवेत करुन नशेली पदार्थ व्यसनाच्या राक्षसी प्रतिकृती पुतळ्यास आग लावण्यात आली. आणि दुध व मिठाई प्राशन करुन नववर्षाचे स्वागत आगळ्या वेगळ्या पध्दतीने करण्याचा मान समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतला.


या कार्यक्रमास वसंतराव वाघ, मनिषा पवार, दादाभाऊ केदारे, राधा क्षीरसागर, शब्बीरभाई खाटीक, आशा भोईर, प्रविण जाधव, प्रकाश गांगुर्डे, रोहीणी जाधव, वर्षा आहीरे, बाळासाहेब क्षीरसागर, भिमा खरात, निर्मला गायकवाड, हेमा चौरे, चार्वाक जाधव, सतिष गायकवाड, मंगला बच्छाव, राजेंद्र जाधव, विकी पगारे, नागमोती, ईत्यादीसह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी " नशा हटाव जिवन और देश बचाव","क्षणाची नशा जीवनाची दुदर्शा". भारत माता की जय या घोषवाक्यांनी घोषणाबाजी करुन परिसर दुमदुमुन  गेला. शेवटी राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या वेळी गुलाबपुष्पे देवुन सर्व पदाधिकारी यांचा सत्कार मनिषा पवार व राधा क्षीरसागर यांनी केला.या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा व कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Pages