वंचीत बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंद च्या हाकेला प्रतिसाद.. किनवट शहर व परिसरात कडकडीत बंद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 24 January 2020

वंचीत बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंद च्या हाकेला प्रतिसाद.. किनवट शहर व परिसरात कडकडीत बंद



वंचीत बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंद च्या हाकेला प्रतिसाद..     
किनवट शहर व परिसरात कडकडीत बंद

किनवट : वंचीत बहूजन आघाडीचे अध्यक्ष व माजी खासदार  ऐड.बाळासाहेब आबेंडकर यांच्या नेतृत्वाखाली आज(दि.२४) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्याला किनवट शहर व परिसरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

 शुक्रवारी(दि.२४) वंचीत बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलन तर्फे CAA, NRC आणि NPR या जुलमी कायद्याविरोधात महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली होती.या हाकेला प्रतिसाद देत शहरातील सर्व प्राथमिक शाळा, विद्यालय आणि महाविद्यालय, भाजी मार्केट  व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. व्यापारी संघटना, विविध पक्ष, मुस्लीम संघटना व विद्यार्थी संघटनांचा या बंदला उत्सफुर्त पाठींबा होता.

बंदच्या यशस्वीतेसाठी वंचित बहुजन आघाडीचे राजु शेळके, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे तालुका अध्यक्ष प्रशिक मुनेश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

No comments:

Post a Comment

Pages