उपचारासाठी रुग्णालयात गेलेल्या आदिवासी युवतीचा डाॅक्टरांकडून विनयभंग:पिडीत युवतीच्या फिर्यादिवरुन गुन्हा दाखल, आरोपी डाॅक्टर मात्र फरार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 16 February 2020

उपचारासाठी रुग्णालयात गेलेल्या आदिवासी युवतीचा डाॅक्टरांकडून विनयभंग:पिडीत युवतीच्या फिर्यादिवरुन गुन्हा दाखल, आरोपी डाॅक्टर मात्र फरार

उपचारासाठी रुग्णालयात गेलेल्या आदिवासी युवतीचा डाॅक्टरांकडून विनयभंग:पिडीत युवतीच्या फिर्यादिवरुन गुन्हा दाखल, आरोपी डाॅक्टर मात्र फरार

किनवट : त्वचेची समस्या असल्याने उपचार घेण्यासाठी शहरातील आंबेडकर चौक परिसरातील एका खासगी रुग्णालयात गेलेल्या वीस वर्षीय आदिवासी तरुणीचा डाॅक्टरने विनयभंग केल्याची घटना शनिवारी (दि. १५) दुपारी घडली.या प्रकरणी पिडित तरुणीच्या फिर्यादीवरून रात्री उशीरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.गुन्हा नोंदविण्यापूर्वि पोलिस ठाण्यात आलेल्या आरोपिस गुन्हा नोंदविण्याची चाहुल लागल्याने आरोपी फरार झाला आहे.
     या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून डॉक्टर विरुद्ध विविध कलमान्वये तसेच अॅट्रासीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील थारा(ता.किनवट) येथील आदिवासी समाजाची तरुणी पेटकुले नगर, गोकुंदा येथे  भाड्याच्या खोलीत राहून गोकुंदा येथीलच एका अकॅडमीत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेत आहे.त्वचेची समस्या      असल्याने पीडित वीस वर्षीय तरुणीचे शहरातील नागरगोजे रुग्णालयात उपचार  चालू होते.शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ती तरुणी आपल्या एका मैत्रिणीसोबत रुग्णालयात गेली असता डॉ. नागरगोजे यांनी तरुणीच्या मैत्रिणीस कॅबिन बाहेर पाठवून, पीडितेचा हात हातात घेऊन फ्रेंडशिप करण्यास सांगीतले व  मिठी मारून विनयभंग केला.याबाबतची फिर्याद पीडित तरुणीने किनवट पोलिस ठाण्यात दुपारीच दिली. त्यावरून आरोपी डॉक्टर विरुद्ध विनयभंग व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अट्रोसिटी कायद्यानुसार रात्री उशीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक हे करीत आहेत.
   दरम्यान,ही घटना दुपारी घडूनही राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांनी गुन्हा मात्र रात्री उशीरा दाखल केला.किनवट पंचायत समितीचे माजी सभापती व भाजपचे दमदार नेते असलेल्या एका नेत्याचा आरोपी हा जावई  आहे.तसेच भाजपचे नवनियुक्त तालुकाध्यक्षाचा आरोपी हा मेव्हुना आहे, त्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास उशिर केला,असा आरोप "बिरसामुंडा ब्रिगेड"चे संस्थापक, अध्यक्ष जयवंत वानोळे यांनी केला आहे.
    येत्या २४ तासाच्या आत आरोपीला अटक न केल्यास पोलिस ठाण्यावर आदिवासी बांधवांचा उद्या(ता.१७) मोर्चा काढण्यात येईल,असा इशारा "आदिवासी विद्यार्थि कृती समिती"चे राज्य अध्यक्ष विकास कुडमेथे यांनी दिला आहे.काल दुपारी घटना घडूनही भाजपचे एक माजी आमदार, खासदार व माजी राज्यमंत्री असलेल्या एका नेत्याच्या दबावाखाली पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास उशिर केला,असा आरोप ही विकास कुडमेथे यांनी केला आहे.


No comments:

Post a Comment

Pages