फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्ट आणि सेक्युलर आर्ट मुव्हमेंट आयोजित संस्कृती अभ्यास सहल - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 16 February 2020

फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्ट आणि सेक्युलर आर्ट मुव्हमेंट आयोजित संस्कृती अभ्यास सहल

फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्ट आणि  सेक्युलर आर्ट मुव्हमेंट
आयोजित संस्कृतीअभ्यास सहल-
२८ फेब्रुवारी ते १२ मार्च

मुंबई : फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्ट तर्फे आयोजित फोटोग्राफी ऑन व्हिल च्या दोन यशस्वी दौऱ्यानंतर आता विदर्भात तिसरा दौरा ता.२८ फेब्रुवारी ते १२ मार्च या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे त्यामध्ये यावर्षी "सेक्युलर मुव्हमेंट," तर्फे "सेक्युलर आर्ट मुव्हमेंट",  सहभागी होत आहे.

 "सेक्युलर मुव्हमेंट", ही भारतीय संविधानानुसार भारतीय समाजाला सेक्युलर बनवण्याचा प्रयत्न करते आहे. या मुव्हमेंट मध्ये "सेक्युलर आर्ट मुव्हमेंट", या नावाने भारतातील अनेक चित्रकार आणि शिल्पकार ही गेल्या दोन वर्षापासून सहभागी झालेले आहेत.

यावेळी अकोला, अमरावती,  यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात  हा दौरा आयोजित केला आहे. या ठिकाणचे स्थानिक नागरिक फोटोग्राफर्स चित्रकार शिल्पकार सामाजिक संस्था अशा विविध वर्गाला भेट देऊन तिथली संस्कृती ती परंपरा जाणून घेत तसेच तिचे दस्तऐवजीकरण "फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्ट" आणि "सेक्युलर मुव्हमेंट" तर्फे आपण करणार आहोत.

 ता.२८ फेब्रुवारी ते ता. १२ मार्च  या  कालावधीत स्थानिक कलाकारांना भेटणे,चित्रकारांना भेटणे,त्यांच्यासाठी वर्कशॉप्स आणि प्रदर्शन आयोजित करणे,आदिवासी जमाती असलेल्या शहरांना भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधणे ,कुपोषण ,प्राणी मानवी संघर्ष समजून घेणे ,अशा कथांचे दस्तऐवजीकरण करणे हे या संकल्पने मागचा उद्दिष्ट आहे़.

या प्रवासात काढण्यात आलेले फोटो ,पेंटिंग्स ,जमा झालेले दस्तऐवज 'सेक्युलर मुव्हमेंट' प्रदर्शनाच्या माध्यमातून समोर आणते,माध्यमाद्वारे त्यांना प्रसिद्धी देते किंवा डॉक्युमेंटरी फिल्म इ.मध्ये ही माहिती वापरली जाते. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी जेष्ठ फोटोग्राफर  पद्मश्री सुधारक ओलवे यांनी नुकतीच केलेली भारतातील कुपोषण विषयाची मालिकाही ही नक्की पहावी.

 "सेक्युलर मुव्हमेंटचे"चे अध्यक्ष प्रा.   गौतमीपुत्र कांबळे हे  सेक्युलर समाज बनविण्यासाठी काय करायला हवे  याबद्दलचे  विचार देत राहतील.
फोटोग्रफी ओन व्हील आणि सेक्युलर आर्ट मुव्हमेंट हा सर्वांसाठी आपल्याला कलाकार आणि माणूस म्हणून विकसित करणारा अनुभव असेल.आपल्याला देखील या सहलीत सामील होण्यास स्वारस्य असल्यास आपण खालील मान्यवरांशी संपर्क साधावा, असे आवाहन सेक्युलर मुव्हमेंट च्या वतीने करण्यात आले आहे.
१)प्राची (Coordinator)
photography.ppt@gmail.com or drop a message at. Mob.no:- 7045301292
२)सुधारक ओलवे  9820904212
३)गौतमीपुत्र कांबळे:9822975430
४)भरत शेळके:9819957501
 ५)प्रभाकर कांबळे:9022514776
६)निलेश किटके:9096555654
लवकरात लवकर जर संपर्क साधला  तर आपणास पुढील प्रवासासाठी रिझर्वेशन करणे आणि येणाऱ्या लोकसंख्ये  प्रमाणे पुढील नियोजन करणे सोयीचे जाईल, त्यामुळे दोनच दिवसात याबाबत आपण येणार किंवा कसे याची माहिती द्यावी,असे आवाहन
"फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्ट "आणि
" सेक्युलर आर्ट मुव्हमेंट " च्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages