आरोपी डाॅ.नागरगोजेला त्वरीत अटक करा,अन्यथा तीव्र आंदोलन: आदिवासी समाजाचा इशारा
या प्रकरणातील आरोपी असलेल्या डाॅ.नागरगोजे यांना त्वरीत अटक करण्यात यावी, या मागणीसाठी आज(दि.१७) पोलीस ठाण्यातील प्रांगणात आदिवासी नेत्यांसह आदिवासी विद्यार्थी, विद्यार्थिंनीनी बैठा सत्याग्रह करून उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले.
यावेळी आदिवासी नेते प्रा. विजय खूपसे, प्रा. किशन मिरासे, बालाजी भिसे, माधवराव किरवले, गोपीनाथ बुलबुले, जयवंत वानोळे, डॉ. आशिष डुडूळे, लक्ष्मणराव सिडाम, संतोष मरस्कोल्हे यांच्यासह आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिंनी किनवट पोलीस स्टेशन प्रांगणात बैठा सत्याग्रहास मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोपी डॉक्टरास तात्काळ अटक न केल्यास लोकशाही मार्गाने पोलीस प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
आरोपीला अटक न केल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी बोलतांना "आदिवासी विद्यार्थि कृती समिती"चे राज्य अध्यक्ष विकास कुडमेथे यांनी दिला आहे.
शनिवारी (दि.१५) दुपारी घटना घडूनही भाजपचे एक माजी आमदार, खासदार व माजी राज्यमंत्री असलेल्या एका नेत्याच्या दबावाखाली पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास उशिर केला,असा आरोप ही विकास कुडमेथे यांनी केला.
शनिवारी (ता.१५) ही घटना दुपारी घडूनही राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांनी गुन्हा मात्र, रात्री उशीरा दाखल केला.किनवट पंचायत समितीचे माजी सभापती व भाजपचे दमदार नेते असलेल्या एका नेत्याचा आरोपी हा जावई आहे.तसेच भाजपचे नवनियुक्त तालुकाध्यक्षाचा आरोपी हा मेव्हुना आहे, त्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास उशिर केला,असा आरोप याप्रकरणी "बिरसामुंडा ब्रिगेड"चे संस्थापक, अध्यक्ष जयवंत वानोळे यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment