सीएए,एनआरसी, एनआरपी विरोधात उद्या किनवटला जाहीर सभा
किनवट : 'संविधान बचाओ,देश बचाओ',या अभियाना अंतर्गत "आम्ही भारताचे लोक",या मंचाखाली एन.आर.सी,सी.ए.ए.व एन.पी.आर.च्या विरोधात मंगळवारी (दि.१८) दुपारी अडीच वाजता शाहीन बाग, उपविभागिय अधिकारी कार्यालयासमोर, गोकुंदा रस्ता,किनवट येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पाॅलिट ब्युरो चे सदस्य,माजी मंत्री व माजी खासदार मोहम्मद सलीम(कोलकाता),जावेद पाशा (नागपूर) व वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुख अहेमद(नांदेड)हे मार्गदर्शन करणार आहेत.अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष इसाखान हे राहणार आहेत.स्वागत अध्यक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य समितीचे सदस्य अर्जून आडे हे आहेत.उपस्थीत राहाण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष साजीद खान यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment