जाणता राजा...छत्रपती शिवराय !.....
जाणता राजा ! महाराज छत्रपती शिवराय.!! अख्ख्या मराठी माणसाच प्रेरणास्थान, उभ्या महाराष्ट्राचं वैभव, मराठी मुलुखाचा रक्षणकर्ता, मराठी जनतेचा राजा...
१९ फेब्रुवारीचा दिवस शुक्रवार इ. स. १६३० ला शिवनेरी गडावर हा वीरपुरुष शहाजीराजे आणि जिजामाता यांच्या पोटी जन्माला आला ! जिजामातेचा शिवबा सह्याद्रीच्या कुशीत, आईच्या मायेत आणि मराठी मावळ्यांच्यासंगतीत या मराठी मुलुखात वाढला आणि जिजाऊ मातेने शिवबाला सर्वांत महत्त्वाचा व पवित्र असा महामंत्र दिला. तो महामंत्र म्हणजे स्वाभिमान ! होय; स्वाभिमानच आणि शिवबांच्या रक्तात जिजाऊने भिनविलेला हा महामंत्र त्यांनी मराठी माणसांच्या सह्याद्रीच्या मराठी मातीत भिनवायला सुरुवात केली आणि त्यात त्यांना यशही आले.
स्वाभिमान! त्याच एका महामंत्राच्या जोरावर सवगड्यांच्या सोबतीने गनिमिकाव्याची मदत घेऊन शिवबांनी स्वराज्याची शपथ घेतली.विरोधही तेवढाच, आणि जिवाला जीव देणारी माणसही तेवढीच. फक्त अनमोल असा एकच महामंत्र स्वाभिमान आणि एक ध्यास स्वराज्य ! शिवबांनी तळहाताएवढ्या मातीवरदेखील हक्क नसलेल्या महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केळे. असंख्य अडचणी, अतोनात कष्ट आणि वेळप्रसंगी मराठी रक्तही देऊन,आजच्या मराठी माणसाचा मोठेपणा ज्या ध्येयासाठी शिवरायांनी अवघं आयुष्य अर्पण केले, स्वराज्याची निर्मिती केली, तोच महाराष्ट्र पुन्हा परकीयांच्या ताब्यात कारण एकच, विसर महापुरुषाच्या बलिदानाचा प्रयत्नांचा आणि महामंत्राचा...
आजचा महाराष्ट्र मराठी मुलुख, एक स्वतंत्र भूमी, आज शिवराय निर्माण होणे अवघड हो अवघड! कसल अशक्यच ; पण आयत मिळालेल स्वराज्य टिकवून देखील ठेवता येऊ नये, ही केवढी मराठीपणाची हार ! गरज फक्त मराठी पण जाग ठेवण्याची आजची गरज फक्त माणुसकी शिकण्याची, गरज फक्त धर्मावरून होणाऱ्या दंगली बंद करण्याची. महापुरुषाच्या होणाऱ्या राजकीय गैरवापराच ! फक्त एवढे जरी आम्ही करू शकलो, तरी जिंकले. सर्वांच्या बलिदानाची जाणीव आहे. उपकारांची जाणीव आहे, म्हणून स्वतःच्या मनाला ओळखलो तरी जिंकलो.तेव्हाच शिवरायांचे , जिजाऊ मातेच, शहाजीराजाचं आणि मावळ्यांच पूर्ण स्वराज्यात स्वप्न पूर्ण होईल. हे स्वराज्य व्हावे, ही श्रींची इच्छा.. मग कुठे आहे ते स्वराज्य, स्वातंत्र्य ? आज आपण स्वतंत्र आहोत. आपल्यावर कुणाचीही सत्ता नाही, प्रत्येकाला आपापली मते मांडण्याचा अधिकार आहे. मग सारे गप्प का? शिवरायांच्या या पवित्र भूमित तुमच्यासारखे थंड कसे? पायाखाली आग असताना सगळा देश जळत असताना, तुमचे-आमचे डोके थंड कसे? खरोखरच का, आमच्या भावना मृत्त पावल्या? नाही.. नक्कीच नाही, प्रत्येकाच्या मनात या देशाबद्दल स्वाभिमान, प्रचंड प्रेम आहे. परंतु आपल्या या भावना सुन्न विषन्न अवस्थेत आहेत. या भावनांना नवचैतन्य देण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे.
मित्रांनो, जिजाऊ मातेने पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न शिवरायांनी प्रत्यक्षात उतरविले. स्वराज्य निर्माण केल, ज्यांनी नुसते मुलुख, प्रदेश जिंकले नाहीत, तर प्रत्येकाच्या मनात स्वाभिमानाची, स्वातंत्र्याची एक ठिणगी पेटविली. नंतर अशा लाखो ठिगण्यांना एकत्र करूनच स्वराज्याची ज्योतिर्मय मशाल पेटविली. जी आजपर्यंत धगधगतेआहे,पण मित्रांनो, जागे व्हा, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा यांनी आपल्या सीमा ओलांडण्यास सुरूवात केली आहे. काळोखाची छाया वाढत आहे,ही स्वराज्याची मशाल आणखी तेजोमय, प्रकाशमय करण्याची गरज आहे. राष्ट्रभक्तीचा दुष्काळ असताना हे कार्य पार पाडण्याची जबाबदारी आपल्या खांदयावर येऊन पडली आहे.
छत्रपती शिवराय यांची जयंती काही फक्त साजरी करण्यासाठी नाही तर त्यांचे विचार, त्यांचा स्वाभिमान अंगीकारण्याची गरज आहे. मला खात्री आहे, त्या स्वराज्य निर्मात्या सूर्याच्या प्रकाशापुढे सर्व अंधार नाहिसा होईल. तरच हे स्वराज्य टिकून राहील, शेवटी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे,मावळे आणि जिजाऊमातेला कोटी-कोटी प्रणाम....!
जय जिजाऊ जय शिवराय....
श्रीकांत संभाजी मगर मो. ९६८९११७१६९
Monday 17 February 2020
जाणता राजा...छत्रपती शिवराय !.....
Tags
# प्रासंगिक लेख
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
प्रासंगिक लेख
Labels:
प्रासंगिक लेख
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment