शनिवारी व रविवारी किनवट येथे १० वी जागतिक धर्म परिषद: उपस्थित रहाण्याचे संयोजन समितीचे आवाहन. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 17 February 2020

शनिवारी व रविवारी किनवट येथे १० वी जागतिक धर्म परिषद: उपस्थित रहाण्याचे संयोजन समितीचे आवाहन.

शनिवारी व रविवारी किनवट येथे १० वी जागतिक धर्म परिषद: उपस्थित रहाण्याचे संयोजन समितीचे आवाहन.

किनवट : येत्या शनिवारी व रविवारी (दि.२२ व २३) असे दोन दिवस दहाव्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे भव्य स्वरूपात आयोजन केले आहे.ही परिषद यशस्वी करण्यासाठी संयोजन समिती मागील दोन महिन्यांपासून अथक परिश्रम घेत आहे.
     या परिषदेला भन्ते सुदस्सन , पुणे, भदन्त चंदिमा, म्यानमार व भदंत थ्यन  हे धम्मदेसना देतील, तर या परिषदेसाठी अखिल भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, प्रा. कांच्या ईलय्या , हैदराबाद,  सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अध्यक्ष महेश भारतीय, प्राध्यापक हमराज ऊइके,  भारत वाघमारे, अभियंता प्रशांत ठमके आदींची उपस्थिती लाभणार आहे.
    दि.२३ रोजी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज  आंबेडकर यांच्या उपस्थितीत धम्म परिषदेचा समारोप होणार आहे.या धम्मपरिषदेत सलग दोन दिवस विविध विषयावर धम्म जागरण,  धम्मदेसना,  परिसंवाद,  कविसंमेलन तसेच सांस्कृतिक संध्या असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.  तसेच विविध देशातून भदन्त संघ, साहित्यिक, विचारवंत,  व्याख्याते,  सुप्रसिद्ध गायक व कलावंत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.त्याच बरोबर सांस्कृतिक संध्या कार्यक्रमात दोन्ही दिवस महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक अशोक निकाळजे,  रिता खांडरे,अकोला,  मनोज राजा गोसावी, नागपूर,  वैभव खुणे, उस्मानाबाद,  स्वप्ना खरात, अकोला,  भिमेश भारती, नागपूर यांच्यासह  नामवंत गायक  भीम बुद्ध गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत.
   ही  धम्मपरिषद यशस्वी करण्यासाठी आयोजक राजू शेळके,  अध्यक्ष अभय नगराळे , स्वागताध्यक्ष प्राध्यापक मोहन मोरे,  निमंत्रक राजू कांबळे , संयोजक राहुल कापसे यांच्यासह संयोजन समितीचे अंकुश भालेराव,  तथागत गायकवाड , सिद्धार्थ तामगाडगे,  राहुल चौदण्ते,  सम्राट कावळे,  प्रशिक मुनेश्वर,  मयुर महाबळे,  विशाल हलवले,  संदीप दोराटे राजीव मगरे, नवीन वाघमारे,  राहुल भगत,  अमर साबळे,  सुगत नगराळे,  राहुल चौदण्ते ( आर सी)दया पाटील, प्रा. सुबोध सरपे, प्रभाकर भगत आदी गेल्या दोन महिन्यापासून अथक परिश्रम घेत आहेत.

No comments:

Post a Comment

Pages