बुधवारी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव ; सहभागी होण्याचे आवाहन.
किनवट : सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, किनवट च्या वतीने कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा उद्या (दि.१९)आयोजित केला आहे.
यानिमित्त मिरवणूक, लेझीम स्पर्धा तसेच दि.२२ रोजी प्रसिद्ध विचारवंत, शिवव्याख्याते तथा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते शिवश्री गंगाधर बनबरे यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे. या शिवजयंती उत्सव सोहळ्यात हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन कदम यांनी जाहीर प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
दि.१९ रोजी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत शिवाजी चौक येथे ध्वजारोहण होणार आहे. अध्यक्षस्थानी आमदार भीमराव केराम हे राहणार आहेत,तर कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री डी.बी. पाटील, खासदार हेमंत पाटील, माजी आमदार प्रदीप नाईक, भाजप नेते अशोक पाटील सूर्यवंशी, पंचायत समितीच्या सभापती हिराबाई आडे, माजी जि.प. सदस्य दिनकर दहिफळे, भाजप नेते सुधाकर भोयर, युवा नेते सचिन नाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल पाटील कराळे, पंचायत समितीचे उपसभापती कपिल करेवाड, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, माजी उपसभापती गजानन कोल्हे, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, नगरसेवक शिवा आंधळे, मनसेचे तालुकाध्यक्ष नितीन मोहरे, शहराध्यक्ष सुनील ईरावार, डॉक्टर प्रसाद सुर्वे, संभाजी ब्रिगेडचे बालाजी शिरसाठ हे उपस्थित राहणार आहेत.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश राठोड, राम पाटील, नारायण सिडाम, श्रीनिवास नेमानीवार, वैजनाथ करपुडे पाटील,पी.रि.पा.चे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, अशोक नेमानीवार, आशिष कराळे पाटील, विनायक गव्हाणे, उमाकांत कराळे, संजय पाटील कदम, मारुती भरकड, सुनील गरड, संतोष डांगे, मारोती दिवसे पाटील, अमरदीप कदम, बाळकृष्ण कदम, अनिल पाटील सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष ईसाखान सरदारखान, माजी नगराध्यक्ष के. मूर्ती, सुरेश पाटील सोळंके, अभय महाजन, राजू पाटील साळुंखे, उत्तम पाटील जाधव, माजी नगराध्यक्ष अरुण आळणे, अभियंता प्रशांत ठमके, यशवंत पाटील कराळे, राजू सुरोशे, श्याम मगर, कपिल अण्णा रेड्डी, मारोती शिरफुले, गोविंद देवडे, पत्रकार प्रदीप वाकोडिकर, शकील बडगुजर, किशन भोयर, "सेक्युलर मुव्हमेंट"चे जिल्हाध्यक्ष अॅड. मिलिंद सरपे, फुलाजी गरड, अरुण तम्मडवार, गोकुळ भवरे, अनिल भंडारे, बी.एल. कागणे, दुर्गादास राठोड, दादाराव कयापाक, चतुरंग कांबळे, तूप्पेकर , आशिष देशपांडे, केशव डहाके, जयवंत चव्हाण, उत्तम कानिन्दे, किरण कीनवटकर, किरण ठाकरे, प्रमोद पहुरकर, आनंद भालेराव, विजय जोशी, जगदीश सामनपेल्लीवार, रवि कानींदे, साजिद बडगुजर, सुरेश कावळे, माधव सूर्यवंशी, शिवाजी काळे, मलिक चव्हाण, दत्ता जायभाये, अँड. सूर्यवंशी, संतोष अनंतवार व इम्रान खान यांची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
जयंतीनिमित्त लेझीम स्पर्धेचे आयोजन केले असून सायंकाळी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची जिजामाता चौकातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच दि.२२ रोजी सायंकाळी सहा वाजता गोपी किशन मंगल कार्यालयात प्रसिद्ध विचारवंत शिवव्याख्याते तथा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते शिवश्री गंगाधर बनबरे यांचे शिवचरित्रावर जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. या शिवजयंती सोहळ्यात हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सचिन कदम, उपाध्यक्ष प्रदीप कोल्हे, रितेश मंत्री, सचिव सुमित माने, कोषाध्यक्ष आकाश इंगोले, सहसचिव नागेश कदम, सहकोषाध्यक्ष विराज शिंदे, कार्यकारणी सदस्य गजानन कदम, पवन रावते, शुभम हसबे, अश्विन पवार, महेश चव्हाण, श्रीकांत मैन्द, अमोल जाधव, श्री पाटील शिंदे, गणेश आमले, विशाल शिंदे, स्वप्निल कोटपेट, राम वानखेडे, जाधव श्रीकांत, बेंद्रे, विक्रम पवार, विलास कानडे, दत्ता शिंदे, अवधूत कदम आदींनी केले आहे.
Monday 17 February 2020
बुधवारी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव ; सहभागी होण्याचे आवाहन.
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment